Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एका अंगठीच्या किंमतीत मुंबईत ७ बेडरुम असलेला फ्लॅट येईल"; सुनील ग्रोव्हरने केला अर्चना पूरण सिंगविषयी मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:37 IST

अर्चना पूरण सिंग आणि सुनिल ग्रोव्हर यांची भेट झाली. तेव्हा सुनिलने अर्चनाच्या हातातील अंगठीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. जाणून घ्या अर्चनाच्या हातातील अंगठीची किंमत

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या सेटवरील कलाकारांची मजा-मस्ती प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. नुकताच या शोच्या चौथ्या सीझनचा शुभारंभ झाला असून, अभिनेत्री अर्चना पूरण सिंह हिने तिच्या यूट्यूब व्लॉगच्या माध्यमातून सेटवरील काही पडद्यामागचे (BTS) मजेशीर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्ये कॉमेडियन सुनील ग्रोवरने अर्चनाच्या हातातील एका मोठ्या हिऱ्याच्या अंगठीचा आणि अंगठीच्या किंमतीचा मोठा खुलासा केला आहे.

अर्चनाने शेअर केलेल्या या व्लॉगमध्ये दिसतं, अर्चना ही सुनील ग्रोवरला त्याच्या व्हॅनिटी वॅनमध्ये भेटायला जाते. त्यावेळी सुनीलने अर्चनाचा हात पकडून कॅमेरामनला तिच्या बोटातील चमकणाऱ्या मोठ्या हिऱ्याच्या अंगठीवर लक्ष द्यायला सांगितले. सुनील म्हणाला की, "या एका अंगठीच्या किमतीत मुंबईतील वरळीसारख्या पॉश भागात ७ बेडरूम, हॉल आणि किचन असलेला आलिशान फ्लॅट आरामात विकत घेता येईल." सुनीलच्या या वक्तव्यावर अर्चनासह तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले. अर्चनाच्या या अंगठीची किंमत १० कोटी असल्याचं समजतंय. 

या संवादादरम्यान सुनीलने अर्चनाला विचारले की, "आम्ही तुझी अशी मस्करी करतो, तेव्हा तुला वाईट वाटत नाही का?" त्यावर अर्चनाने अतिशय खेळकरपणे उत्तर दिले. ती म्हणाली की, "तुम्ही सर्व माझी स्वतःची माणसे आहात, त्यामुळे तुम्ही मला काहीही बोललात तरी मला अजिबात वाईट वाटत नाही. मात्र, बाहेरच्या कोणा व्यक्तीने अशी हिम्मत केली, तर मग बघू.". अशाप्रकारे 'द कपिल शर्मा शो'मुळे सर्व कलाकारांचं ऑफस्क्रीन छान नातं बघायला मिळतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunil Grover Jokes Archana Puran Singh's Ring Equals Mumbai Flat!

Web Summary : On 'The Great Indian Kapil Show,' Sunil Grover playfully revealed Archana Puran Singh's ring's value. He joked it could buy a luxurious Mumbai flat. Archana takes the jokes sportingly.
टॅग्स :सुनील ग्रोव्हरअर्चना पूरण सिंगटेलिव्हिजनटिव्ही कलाकार