Join us  

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षयाने शेअर केला हॉट फोटो, म्हणाली, "माझ्या चाहत्यांना हा बोल्ड फोटो..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 1:22 PM

"हा बोल्ड फोटो पोस्ट करताना मी...", हॉट फोटो शेअर करत अक्षयाची पोस्ट

सडपातळ आणि फिगर असलेल्याच मुली अभिनेत्री होऊ शकतात ही चौकट मोडून आज अनेक अभिनेत्रींनी कलाविश्वात नाव कमावलं आहे. यांच्यापैकीच एक म्हणजे अक्षया नाईक. 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्षयाने लतिकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनं जिंकली. अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अक्षया पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. 

नुकताच अक्षयाने इन्स्टाग्रामवरुन तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत मराठमोळ्या अक्षयाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत अक्षयाने पोस्टही लिहिली आहे. "बऱ्याच दिवसांनंतर हा फोटो माझ्या फोनमधून मी इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये हे फोटोशूट मी केलं होतं. हा फोटो पोस्ट करताना मी खूप विचार केला. माझ्या चाहत्यांना हा बोल्ड फोटो आवडेल का? याची मला खात्री नव्हती," असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे अक्षया म्हणते, "कधीही न करण्यापेक्षा उशीर चांगला...आणि मी कलाकार असल्याची मला जाणीव झाली. जर मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आले नाही तर मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही." अक्षयाच्या या फोटोवर सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. तिचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

दरम्यान, अक्षयाने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत अक्षया महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तिने 'चूक भूल द्यावी घ्यावी' या झी वाहिनीवरील मालिकेतही काम केलं आहे. त्याचबरोबर 'सावधान इंडिया'मध्येही अक्षया झळकली होती.  

टॅग्स :अक्षया नाईकटिव्ही कलाकार