Join us

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं स्वप्न साकार! मुंबईत 'या' ठिकाणी घेतलं हक्काचं घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:36 IST

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम मीनाक्षी राठोडने मुंबईत घेतलं हक्काचं घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष

Meenakshi Rathod: अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिका चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. मालिकेती जयदीप-गौरी तसंच माई, शालिनी, देवकी आणि मल्हार या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंस केलं. या मालिकेचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. दरम्यान, 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मध्ये देवकी नावाचं पात्र साकारुन अभिनेत्री मिनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) घराघरात पोहोचली. तिने साकारलेलं पात्र अनेकांच्या पसंतीस उतरलं. सध्या मीनाक्षी 'लक्ष्मी निवास' या मालिकेत काम करताना दिसते आहे. नुकतीच मीनाक्षी राठोडने सोशल मीडियावर एक पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. 

मीनाक्षी राठोडने पती कैलास वाघमारेच्या साथीने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. "मुक्काम पोस्ट गोरेगाव मुंबई .स्वप्नाच्या शहरात हक्काचं घर! थॅंक्यू मुंबई ! तुझ्यात सामावून घेतलं!" अशा आशयाची ही पोस्ट तिने शेअर केली आहे.  मीनाक्षी राठोडने मुंबईत स्वत:च्या हक्काचं पहिलं घर खरेदी केलं आहे. अभिनेत्याचं हे घर गोरेगाव परिसरात आहे. नव्या घराची पहिली किल्ली आणि झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अखेर हक्काचं पहिलं घर खरेदी करून अभिनेत्रीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.   मीनाक्षी व कैलासने नव्या घराच्या नेमप्लेटवर लेकीच्या नावाला अधिक प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. यारा, मीनाक्षी, कैलास असं नेमप्लेटवर लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकार मंडळींनी मीनाक्षी राठोड आणि तिचा पती कैलास वाघमारेवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री दिव्या पुगावकर, सुयश टिळक, रेश्मा शिंदे, साक्षी गांधी तसेच गिरीजा प्रभू, अक्षया देवधर, माधवी निमकर, अश्विनी कासार अशा अनेक कलाकारांनी या कपलला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमुंबईसोशल मीडिया