Join us

गौरीने शेअर केला जवळच्या व्यक्तीचा फोटो; चाहत्यांना पडला भलताच प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:22 IST

Girija prabhu: अलिकडेच गिरीजाने इन्स्टाग्रामवर एका मुलासोबत फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने शेअर केल्यानंतर क्षणार्धात तो व्हायरल झाला.

 'सुख म्हणजे नक्की काय असतं'  (Sukh Mhanje Nakki Kay Asat)  ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत यशस्वी घोडदौड करत आहे. या मालिकेच्या उत्तम कथानकासोबतच त्यातील कलाकारही लोकप्रिय होत आहेत. त्यामुळेच ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होतांना दिसते. विशेष म्हणजे या मालिकेत गौरी अल्पावधीत लोकप्रिय झाली असून तिचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौरीने म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने (Girija Prabhu) एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

कलाविश्वाप्रमाणेच गिरीजा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिच्या जीवनातील लहान-मोठे क्षण, आनंदही नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते.यामध्येच तिने एका जवळच्या व्यक्तीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत एक मुलगा दिसून येत आहे. त्यामुळे हा मुलगा कोण हा एकच प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अलिकडेच गिरीजाने इन्स्टाग्रामवर एका मुलासोबत फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने शेअर केल्यानंतर क्षणार्धात तो व्हायरल झाला. इतकंच नाही तर तिच्यासोबत दिसत असलेल्या मुलाविषयी जाणून घेण्यासाठीही नेटकरी आतूर झाले होते. गिरीजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणारा मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून तिचा भाऊ आहे. गौरव प्रभू असं त्याचं नाव आहे.

दरम्यान, या फोटोमधून गिरीज आणि तिच्या भावामध्ये असलेलं सुंदर बाँडिंग दिसून आलं. गौरवदेखील सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. गिरीजा सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जरी साध्याभोळ्या सुनेची भूमिका साकारत असली. तरीदेखील ती खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन