Join us

"मी विद्या बालनला फोन केला...", सुचित्रा बांदेकरांना आलेला रिजेक्शनचा अनुभव, सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:26 IST

सुचित्रा बांदेकर यांनी कधी फारसं जाहिरातीत काम केलं नाही. याचा एक किस्सा त्यांनी सांगितला ज्यात त्यांनी विद्या बालनचाही उल्लेख केला.

अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar)  अनेक वर्षांपासून हिंदी, मराठी मनोरंजनविश्वात कार्यरत आहेत. १९९४ पासून त्या हिंदी, मराठी टेलिव्हिजन आणि सिनेमांमध्ये काम करत आहेत. 'हम पांच', 'अवंतिका', 'वहिनीसाहेब' पासून ते आता त्या 'मनपंसद की शादी' या हिंदी मालिकेत झळकत आहेत. दरम्यान त्यांनी 'बाईपण भारी देवा' हा हिट सिनेमाही दिला. मात्र सुचित्रा बांदेकर यांनी कधी फारसं जाहिरातीत काम केलं नाही. याचा एक किस्सा त्यांनी सांगितला ज्यात त्यांनी विद्या बालनचाही उल्लेख केला.

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "मला करिअरमध्ये रिजेक्शन बऱ्याचदा मिळालं. जाहिरातींमध्ये मला रिजेक्ट केलं. मी शॉर्ट लिस्ट व्हायचे आणि काम मिळायचं नाही. विद्या बालन तेव्हा खूप जाहिराती करायची. आम्ही 'हम पांच' मध्ये एकत्र काम केलं होतं. माझ्याकडे विद्याचा नंबर होता. मी एका मोटरबाईकची स्क्रीन टेस्ट दिली होती आणि मी शॉर्टलिस्ट झाल्याचा मला फोन आला होता. मग तीन दिवस गेले आणि पुढे काहीच आलं नाही. मी विद्याला फोन करुन विचारलं की 'तू एवढ्या जाहिराती करतेस ना, शॉर्टलिस्ट झाल्यानंतरचं फायनल आपल्याला कधी कळतं?' तिने विचारलं कोणत्या जाहिरातीबद्दल विचारतीये तू? मी म्हणाले, 'ती होंडाची जाहिरात'. तर विद्या म्हणाली, 'सुचि, मी त्याच फायनल झाले आहे. पण तू नेहमी ऑडिशन्स साठी नक्की जात जा. शॉर्टलिस्ट होत असशील तर नक्कीच तुला पुढे काम मिळेल.' पण मग मी काही पुढे जाहिराती केल्याच नाहीत.

सुचित्रा बांदेकर या आदेश बांदेकरांच्या पत्नी आहेत. मराठीतली ही लोकप्रिय जोडी आहे. बांदेकर कुटुंबाची स्वत:ची निर्मिती संस्थाही आहे. सोहम प्रोडक्शन्स असं कंपनीचं नाव आहे. मुलगा सोहमच्या नावावरच हे नाव आहे. स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' ही सर्वात गाजणारी मालिका सोहम प्रोडक्शन्स अंतर्गत आहे.

टॅग्स :मराठी अभिनेताविद्या बालनजाहिरात