Join us
Daily Top 2Weekly Top 5

Subi Suresh Death: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, अवघ्या ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 15:43 IST

सुबी यांनी फार कमी वेळात अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांच्या अचानक जाण्यानं कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुबी सुरेश यांचं निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनाने मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. बुधवारी सकाळी कोची येथील खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झाले.

रिपोर्टनुसार, सुबी यकृताशी संबंधित आजाराने ग्रस्त होत्या. सुबी हे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते, ज्यांनी विविध चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सुबी सुरेश यांनी आपल्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. त्यानंतर त्या स्टेज शोमध्ये कॉमेडी करू लागल्या. टीव्ही इंडस्ट्रीतही त्यांनी अनेक भूमिका केल्या. 'सिनेमाला' नंतर सुबी सुरेश यांनी लहान मुलांच्या 'कुट्टी पट्टलम' या शोद्वारे टीव्हीवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या 'कुट्टी कलवारा' या स्पेशल कुकरी शोमध्येही दिसल्या.

सुबी यांनी फार कमी वेळात तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अभिनेत्रीनं अनेक टेलिव्हिजनवर चॅनेलमध्ये काम केलं. अनेक लाईव्ह स्टेज शोचा प्रसिद्ध चेहरा होती. आपल्या छोट्याश्या  करिअरमध्ये त्यांनी 20हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं.

सुबी यांच्या पश्चात त्यांचं आई-वडील आणि भाऊ असं कुटुंब आहे. त्यांच्या अचानक जाण्यानं कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. त्याचप्रमाणे सुबी यांच्या अकाली निधनामुळे प्रेक्षकही हळहळ व्यक्त करतायेत. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीमृत्यू