Tharla Tar Mag: एखाद्या मालिकेत रंजक वळण आलं की त्या मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढू लागते. शिवाय याचा परिणाम हा त्या मालिकेच्या टीआरपीवर सुद्धा होता. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी असे अनेक प्रयोग वाहिन्यांकडून केले जातात. 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका त्याला अपवाद ठरली आहे. ही मालिका सुरुवातीपासूनच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल आहे. कथा, विषय, मांडणी, अभिनय या साच्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. सध्या मालिकेत सायली-अर्जुनने लग्न करुन आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. परंतु सुभेदारांना सायली सून म्हणून मान्य नाही. घरातील प्रत्येक सदस्य हा तिच्या विरोधात आहे. पण, आपण या प्रत्येकाची मनं जिंकू असं सायलीने ठामपणे मनाशी ठरवलं आहे. सध्या या मालिकेत अर्जुन सुभेदार जोशी वकिल आणि महिपत शिखरे यांचा कारस्थानाचा पर्दाफाश करणार असल्याचा सीक्वेंस चालू आहे.
सोशल मीडियावर 'ठरलं तर मग' च्या पुढील भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.या मालिकेमध्ये एकीकडे जोशी वकील आणि महिपत शिखरेचा खोटेपणा सर्वांसमोर आणून अर्जुन सासरे मधुकर पाटलांना या कचाट्यातू कसा बाहेर काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. याचदरम्यान, अर्जुनच्या हाती आता नवीन पुरावा लागला आहे. वात्सल्य आश्रम मर्डर केसच्या वेळी खूनाच्या रात्री मी अथर्व विचारेच्या अंतिमविधीला गेले होते असा जबाब साक्षी शिखरेने कोर्टात दिलेला असतो. याशिवाय अर्थवच्या शाळेचे खोटे कागदपत्र सुद्धा कोर्टात सादर केलेले असतात. परंतु हा अर्थव विचारे जिवंत असल्याचा महत्वाचा पुरावा आता त्यांच्या हाती लागला आहे. या अर्थव विचारेच्या भूमिकेत एक लोकप्रिय अभिनेता मालिकेत दिसणार आहे.
अथर्व विचारेच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता
'ठरलं तर मग' मध्ये अभिनेता अनिरुद्ध जोशी हा अथर्व विचारेची भूमिका साकारणार आहे. अनिरुद्धच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर त्याने कलर्स मराठीवरील 'सुख कळले' या मालिकेत तो झळकला आहे. या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी सोबत त्याने स्क्रीन शेअर केली. याशिवाय अनिरुद्धने 'जय मल्हार' मालिकेमध्ये नारद ऋषींची भूमिकेत दिसला होता. लवकरच अभिनेता 'ठरलं तर मग' मालिकेच्या महाशिवरात्री विशेष भागात पाहायला मिळणार आहे.