Join us

अभिनेता ध्रुव दातारने 'या' कारणामुळे सोडली 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका; VIDEO शेअर करत म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 10:29 IST

छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' ( Laxmichya Paulanni ) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Laxmichya Paulanni : छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' ( Laxmichya Paulanni ) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या मालिकेच्या कथानकाप्रमाणे त्यातील कलाकार आणि त्यांचा अभिनय देखील प्रेक्षकांच्या आवडतो आहे. अभिनेता अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांनी मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत. कला आणि अद्वैतची यांची जोडी सर्वांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळतंय. तर अद्वैतच्या दोन भावांच्या भूमिकेमध्ये अभिनेता ध्रुव दातार आणि रुत्विक तळवलकर दिसत आहेत. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत राहुल नावाचं खलनायिकी पात्र साकारणाऱ्या ध्रुव दातारने मालिकेत अचानक एक्झिट घेतली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. अभिनेत्याने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. 

ध्रुव दातारने मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले आहेत. दरम्यान, नुकताच सोशल मीडियावर ध्रुवने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अभिनेत्याने मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला, याचं कारण त्याने सांगितलं आहे. ध्रुवने या व्हिडिओमध्ये म्हटलंय की, "नमस्कार! कसे आहात सगळे? माझा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे, मला खूप लोकांचे मेसेज येतायंत की तू सीरियल का सोडली? तर माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला ही मालिका सोडावी लागली, पण मला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद येत आहे की, आम्हाला तुझी आठवण येईल, तुझं काम खूप छान होतं, तर या सगळ्यासाठी तुमचे मनापासून आभार! तुमच्या या प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद."

पुढे व्हिडीओमध्ये ध्रुवने असंही म्हटलंय की, "तुम्ही जसा मला पाठिंबा दिला आहे, तसाच पाठिंबा नवीन राहुललाही द्या. लवकरच भेटू असं आश्वासनही त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिलं आहे. "

ध्रुवने 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आता त्याच्या जागी अभिनेता अद्वैत कडणे ची मालिकेत एन्ट्री झाली आहे. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता अद्वैत कडणे हा कलाकार आता 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत राहुलची भूमिका साकारताना दिसतो आहे. अद्वैतने 'आई कुठे काय करते'मध्ये ईशाचा बॉयफ्रेंड साहिलची भूमिका साकारली होती. त्याने 'जाऊ नको दूर बाबा', 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया