Laxmichya Pavlanni Serial: अभिनेता अक्षर कोठारी आणि ईशा केसकर मुख्य भूमिकेत असलेली 'लक्ष्मीच्या पावलांनी' ( Laxmichya Paulanni ) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. दिवसेंदिवस या मालिकेचा चाहतावर्ग वाढतो आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेली ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. या मल्टिस्टारर मालिकेत अक्षर कोठारी, ईशा केसकरसह अभिनेत्री किशोरी अंबिये, मंजुषा गोडसे आणि दिपाली पानसरे असे कलाकार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका एका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. नुकताच सोशल मीडियावर स्टार प्रवाहकडून 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोने सध्या लक्ष वेधलं आहे.
लवकरच 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेचा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. नैनाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रमाच्या नावावर तिच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य सगळ्यांसमोर आणून तिला घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन रोहिणी करते. ओटीभरण्याच्या निमित्ताने रोहिणी नैनाने प्रेग्नन्सीचं नाटक करताना पोटाला बांधलेली फेकून देते आणि सत्य घरातील माणसांच्या समोर आणते. हे सगळं केल्यामुळे नैनाबसोबतच कलादेखील चांदेकरांच्या घरातून हकलण्यात येईल अशी सूडभावना रोहिणीची असते. शिवाय नैना हे सगळं तिला कलाने करायला सांगितलं असं म्हणते स्वत: ची बाजू सावरुन घेते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, अखेर कला सौरभच्या मदतीने नैनाच्या खोटेपणाचं सत्य सर्वांसमोर आणते आणि स्वत: वरील आरोप खोटे असल्याचं सिद्ध करते.
नव्या प्रोमोने वेधलं लक्ष
या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, सुरुवातीला कला तिच्या ऑनस्क्रीन सासूबाई सरोज चांदेकर यांना म्हणते, सरोज मॅडम माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यानंतर पुरावा म्हणून ती नैनाचा मित्र सौरभला घेऊन येते. पुढे सौरभ घरातील सगळ्यांना सांगतो स्वत: च्या खोट्या प्रेग्नन्सीचा प्लॅन हा नैनाचा होता. कलाचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यानंतर कला तिचा नवरा अद्वैतला वचन देत म्हणते, चांदेकर चूक कोणाचीही असो पण तुझ्या आणि घरातील कोणाच्याही विश्वासाला तडा जाणार नाही. या घरची सून म्हणून मी आज तुला खात्री देते. आता हा भाग केव्हा प्रसारित केला जाणार याची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.
दरम्यान, 'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका दररोज रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळते आहे.