Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोहम बांदेकर-पूजा बिरारी यांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा! राजकीय अन् कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:22 IST

बांदेकरांच्या लेकाचं रिसेप्शन! मराठी कलाकारांची मांदियाळी, व्हिडीओ बघा

Soham Bandekar And Pooja Birari Wedding Reception: गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर यांचा लेक सोहमच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती.  अखेर २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात लग्नगाठ बांधून ते दोघे साता जन्माचे सोबती झाले. बांदेकरच्या एकुलत्या एक लेकाच्या लग्नाचा मोठ्या थाटामाटात पार पडला.त्यानंतर काल मंगळवारी मुंबईत या नव्या उभयतांचा लग्नाचा ग्रँड रिसेप्शन सोहळा पार पडला. मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवर देखील या कार्यक्रमाला हजेर राहिले होते. सध्या सोशल मीडियावर पूजा-सोहमच्या रिसेप्शनचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

सोहम आणि पूजा यांच्या रिसेप्शन पार्टीत रोहिणी हट्टंगडी, अजिंक्य देव, कविता मेढेकर, संजय राऊत, रवी जाधव, केदार शिंदे,तसेच संजय राऊत, उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे असे अनेक मान्यवर नव वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले.तसेच सिद्धिविनायक मंदिराच्या मुख्य गुरुजींकडून बांदेकर कुटुंबाला आशीर्वाद देण्यात आले.  त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना देखील या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.

पूजा बिरारीने या रिसेप्शन सोहळ्यासाठी सिल्व्हर रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.शिवाय त्यावर साजेस डायमंड नेकलेस घातला आहे. त्याचबरोबर सोहम बांदेकरने निळ्या रंगाचा सूट घातला.

वर्कफ्रंट

पूजा बिरारीने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं'  या मालिकेत काम करताना दिसते आहे. याशिवाय 'स्वाभिमान', 'साजणा' या मालिकांमध्येही ती दिसली होती. तर सोहम बांदेकर निर्माता आहे. त्यांचं 'बांदेकर प्रोडक्शन्स' आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Soham Bandekar and Pooja Birari's grand reception; celebrities attend.

Web Summary : Soham Bandekar and Pooja Birari's wedding reception in Mumbai saw many celebrities and politicians in attendance. Videos from the event are viral. The couple married on December 2, 2025, in Lonavala. Pooja is an actress, while Soham is a producer.
टॅग्स :आदेश बांदेकरटेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया