गेल्या अनेक दिवसांपासून स्मृती मंधानाच्या लग्नाची चर्चा सुरु होती. पण अशातच स्मृतीच्या वडिलांची तब्येत खालावल्याने लग्न पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर पलाशचीही तब्येत खालावल्याची माहिती समोर आली. अशातच पलाशने स्मृतीला फसवलं असल्याच्या चर्चा समोर आल्याने सर्वांना धक्का बसला. लग्न काही तासांवर असताना अशा चर्चा सुरु झाल्याने स्मृतीच्या चाहत्यांना भुवया उंचावल्या. या सर्व चर्चांदरम्यान स्मृतीने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.स्मृतीने घेतला आणखी एक मोठा निर्णय
वैयक्तिक आयुष्यात आलेल्या या समस्येमुळे स्मृतीने 'कौन बनेगा करोडपती १७' (KBC 17) च्या विशेष वर्ल्ड कप एपिसोडच्या शूटिंगमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कौटुंबिक आणि भावनिक अडचणींचा सामना करणाऱ्या स्मृती मंधानाने 'कौन बनेगा करोडपती १७' च्या एका विशेष भागातून माघार घेतली आहे. सध्या उलटसुलट चर्चांदरम्यान कुटुंबाची प्रायव्हसी जपण्यासाठी स्मृतीने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे 'कौन बनेगा करोडपती १७'च्या या विशेष भागात स्मृतीचे चाहते तिला नक्कीच मिस करतील.
Web Summary : Smriti Mandhana postponed her wedding due to her father's health. Cheating rumors involving her partner surfaced. Amidst this, she withdrew from 'KBC 17' to protect her family's privacy, respecting her emotional state.
Web Summary : स्मृति मंधाना ने अपने पिता के स्वास्थ्य के कारण शादी स्थगित कर दी। उनके साथी से जुड़े धोखे के अफवाह सामने आए। इसके बीच, उन्होंने अपने परिवार की गोपनीयता की रक्षा के लिए 'केबीसी 17' से नाम वापस ले लिया, उनकी भावनात्मक स्थिति का सम्मान किया।