Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देशाला तुमचा अभिमान असून..'; स्मृती इराणी निवडणूक हरल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 15:26 IST

स्मृती इराणींचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनुपमा फेम लोकप्रिय अभिनेत्याने त्यांना समर्थन दर्शवणारी खास पोस्ट लिहिली आहे. (smriti irani)

लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी ४ जूनला सर्वांसमोर आला. या निवडणुकीत अनेक ठिकाणी अनपेक्षिक निकाल समोर आले. यातील महत्वाचा निकाल म्हणजे स्मृती इराणी. स्मृती यांना अमेठी मतदारसंघातून पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. अशातच अनुपमा फेम लोकप्रिय अभिनेता सुधांशू पांडेने स्मृती यांना धीर देणारी एक पोस्ट लिहिली आहे. जी चांगलीच चर्चेत आहे.

अनुपमा फेम सुधांशू पांडेची स्मृती इराणींसाठी पोस्ट

अनुपमा फेम सुधांशू पांडेने स्मृती इराणींसाठी खास पोस्ट केलीय. सुधांशू लिहितात, "तुम्ही देशाचा अभिमान आहात. याशिवाय देशातील महिलांसाठी तुम्ही एक प्रेरणास्थान आहात. तुम्ही यापेक्षा चांगला विजय मिळवून कमबॅक कराल. जय महाकाल. जय श्रीराम." अशाप्रकारे सुधांशूने स्मृती इराणींच्या पराभवानंतर त्यांना धीर देणारी खास पोस्ट लिहिली आहे जी चर्चेत आहे.

निवडणुकीत पराभव झाल्यावर स्मृती इराणींची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूक हरल्यावर स्मृती इराणींनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. त्या लिहितात, 'आयुष्य असंच असतं. माझ्या आयुष्यातील गेली दहा वर्ष एका गावातून दुसऱ्या गावात जाणे, आशा आणि आकांक्षा वाढवणे, जनतेच्या पायाभूत सुविधांवर काम करणे, रस्ते-नाले-बायपास-मेडिकल कॉलेज आणि बरंच काही.. माझ्या पराभवात आणि विजयात पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांची मी ऋणी आहे. मला अजूनही कोणी विचारलं तर Hows The Josh? मी आजही तेच म्हणेल High Sir!

 

टॅग्स :स्मृती इराणीभाजपाअमेठीनरेंद्र मोदी