Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:31 IST

व्लॉगमधून अभिनेत्रीने ट्रोलर्सला उत्तर दिलं

हिंदी मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री स्मृती खन्नाने (Smriti Khanna) दोन महिन्यांपूर्वी बाळाला जन्म दिला. तिला गोंडस मुलगी झाली. स्मृतीने लेकीचं नाव 'ऐझाह' असं ठेवलं. स्मृतीच्या पतीचं नाव गौतम गुप्ता आहे. पती पत्नी दोघंही हिंदू असून त्यांनी लेकीचं नाव मुस्लिम ठेवल्याने नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर स्मृतीला आक्षेपार्ह मेसेजही आले. या प्रकरणी नुकतंच तिने व्लॉगमधून भाष्य केले आहे. स्मृती खन्ना तिच्या व्लॉगमध्ये म्हणाली, "हा व्लॉग माझ्या मुलीच्या संदर्भातला आहे. तिच्या नावावरुन लोक मला घाणेरडे आणि भयंकर मेसेज करत आहेत. हे नाव मुस्लिम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण मला लोकांचं हे वागणं खूप धक्कादायक आणि लज्जास्पद वाटतं. एखाद्या नावाचा धर्माशी संबंध कसा असू शकतो? मला ऐजाह हे नाव आवडलं म्हणून मी ठेवलं. माझी मोठी लेक अनायकानेच हे नाव निवडलं आहे. म्हणून हे नाव खूप खास आहे आणि हेच महत्वाचं आहे. एखाद्याच्या बाळाच्या नावावरुन तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्हाला खरंच मदतीची गरज आहे. तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मला सरळ अनफॉलो करा."

स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. २०२० मध्ये स्मृतीने अनायकाला जन्म दिला. तर आता  नुकतीच तिला दुसरी मुलगी झाली आहे. स्मृती लग्नानंतर स्क्रीनपासून लांब गेली. तिने याआधी 'ये है आशिकी','बालिका वधू' या मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारट्रोलपरिवार