Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसमधून घरी आल्यावर अभिजीत सावंतने केली 'ही' खास गोष्ट, म्हणाला- "माझ्या घरात यापुढे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 15:40 IST

अभिजीत सावंतने बिग बॉस मराठीमधून घरी आल्यावर खास गोष्ट केलीय जी चर्चेत आहे (abhijeet sawant, bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले रविवारी ६ ऑक्टोबरला पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाणने बाजी मारली. याशिवाय अभिजीत सावंतबिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा उपविजेता झाला. अभिजीत सावंतची बिग बॉस मराठीमध्ये चांगलीच चर्चा होती. घराबाहेर आल्यावरही अभिजीत विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. अशातच घराबाहेर आल्यावर अभिजीतने एक खास गोष्ट केलीय ज्याची चांगलीच चर्चा आहे.

अभिजीतने घराबाहेर आल्यावर केली ही खास गोष्ट

अभिजीतने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत तो सांगतो की, "हॅलो, नमस्कार सर्वांना. बिग बॉसची मी आठवण मी माझ्यासोबत ठेवलीय. हे मला तुम्हालापण दाखवायचाय. माझी १६ नंबरवर असलेली अभिजीत सावंत नावाची पाटी बिग बॉसच्या घरात होती. मी विचार केला की माझ्या घरात पण लागेल. कारण ज्याप्रकारे तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवलाय. माझा खरेपणा मी दाखवलाय, तेच मी पुढे पण बाळगतोय. अभिजीत सावंतची पाटी बिग बॉसच्या घरात होती आज ती मी अभिमानाने माझ्या घरात लावलीय. " असं म्हणत अभिजीतने सर्वांचे आभार मानले. 

अभिजीत ठरला बिग बॉस मराठीचा रनरअप

बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. ७० दिवस चाललेल्या या शोमधून सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. टॉप ६ मधून अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे टॉप २ पर्यंत पोहोचले. या दोघांमध्ये बारामतीच्या सूरज चव्हाणने ट्रॉफी नावावर केली. सूरज ट्रॉफी जिंकला असला तरी अभिजीतने सर्वांचं मन जिंकलं आहे. रनर अप ठरला असला तरीही अभिजीत सावंतने सर्वांचं मन जिंकलं.

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत सावंतटेलिव्हिजन