Join us

श्वेता खरातने पहिल्यांदाच शेअर केला कुटुंबासोबतचा फोटो; पाहा कोण आहे तिच्या फॅमिलीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 17:26 IST

Shweta kharat: श्वेताचे कुटुंबीय सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत.

'मन झालं बाजिंद' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात (shweta kharat). सोशल मीडियावर सक्रीय असलेली श्वेताविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळे तिच्या कुटुंबात कोण आहे? ते काय करतात? असं सगळं काही जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यामध्येच श्वेताने पहिल्यांदाच तिच्या कुटुंबियांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

श्वेता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने तिच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला. श्वेताचं चौकटी कुटुंब आहे. यात तिचे आई-वडील आणि भाऊ यांचा समावेश आहे.

श्वेताने तिच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. यात तिचं चौकोनी कुटुंब दिसून आलं. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. श्वेता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी