Join us

माधुरीसोबत स्टेज शेअर करताना श्रेयाने केलं 'हे' धाडस; फोटो पोस्ट करत म्हणाली,'आमचा doctor..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 12:17 IST

Shreya bugade: अलिकडेच माधुरीने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

आजच्या घडीला श्रेया बुगडे (shreya bugade) हे नाव माहित नाही असं म्हणणारा व्यक्ती क्वचितच एखादा सापडेल. 'चला हवा येऊ द्या'ची (chala hawa yeu dya) लेडी बॉस म्हणून श्रेया लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे विनोदाच्या दुनियेत स्त्रियाही मागे नाहीत हे श्रेयाने सिद्ध करुन दाखवलं आहे. आजवर श्रेयाने तिच्या अभिनयातून आणि विनोदातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. इतकंच नाही तर तिने अनेक दिग्गजांच्या भूमिकाही वठवल्या आहेत. यामध्ये पहिल्यांदाच तिला धकधक गर्ल माधुरी दिक्षित (madhuri dixit) हिच्यासोबत स्टेज शेअर करायची संधी मिळाली. याविषयी तिने पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

श्रेयाने तिच्या इन्स्टाग्रामवर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत. या तिच्यासोबत माधुरी दिक्षित दिसून येत आहे. अलिकडेच माधुरीने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यावेळी श्रेयाने माधुरी समोर हम आपके हैं कौन या सिनेमातील निशाची भूमिका साकारली. तिचा अभिनय पाहून माधुरी सुद्धा थक्क झाली. इतकंच नाही तर या दोघींनी या सिनेमातील गाण्यावर तालही धरला.

दरम्यान, ''गेली अनेक वर्ष हवा येऊ द्या मुळे अनेक ‘challenging characters’ करायला मिळाली. पण, कधी कधी आमचा doctor खूपच धाडसी गोष्टी करायला लावतो ...हे मी केलेलं धाडस" , असं कॅप्शन देत श्रेयाने माधुरीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

टॅग्स :श्रेया बुगडेमाधुरी दिक्षितटेलिव्हिजनटिव्ही कलाकारचला हवा येऊ द्या