Join us

शिवा देणार आशुवरच्या प्रेमाची कबुली; काय असेल आशुचं उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 15:08 IST

Shiva: प्रेमाची कबुली दिल्यानंतर आशू आणि दिव्याच्या लग्नाचं सत्य शिवासमोर येईल का?

 छोट्या पडद्यावर अलिकडेच शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीत या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या मालिकेची चर्चा रंगत असते. लवकरच या मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे. आजवर आशूसोबत चांगली मैत्री असलेली शिवा चक्क त्याच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहे. 

अलिकडेच एका प्लांटच्या व्हिजिटसाठी आशु शिवाला घेऊन जातो. मात्र, परतीच्या वाटेवर  त्यांची गाडी एका जंगलात बंद पडते आणि त्यांना एका आदिवासी पाड्यावर रात्रभर थांबाव लागतं. तिथे त्यांना नवरा- बायको असण्याच नाटक करावं लागत. आदिवासी पाड्यावर दोघे एकत्र डान्स करतात, एका ताटात जेवणं करतात. विशेष म्हणजे या एका दिवसामध्ये शिवाला आशुवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते. त्यामुळे ती घरी परत आल्यावर तिच्या गँगसमोर शिवावर असलेल्या प्रेमाची कबुली देते.

दरम्यान, आशुने चांगला रिपोर्ट तयार केल्यामुळे रामभाऊ त्याच्यावर खुश होतात. म्हणून, आशु सुद्धा शिवाने मदत केल्यामुळे तिला कानातले गिफ्ट करतो. दुसरीकडे शिवाही आशुसाठी तयार करते. यामध्येच शिवाचं आशुवर प्रेम असल्यामुळे ते दिव्या आणि आशुचं लग्न मोडायचा प्लॅन करतात. ते गॅरेज छान सजवतात. आता शिवा आशूसमोर तिच्या प्रेमाची कबुली देईल का? आशु तिच्या भावना समजू शकेल का? काय असेल त्याचं उत्तर? आशू आणि दिव्याच्या लग्नाचं सत्य शिवासमोर येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी