Join us

'वो दिल नहीं..'; शिवालीने शेअर केलेली 'ती' खास पोस्ट नेमकी कोणासाठी?; नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 18:17 IST

Shivali parab: शिवालीने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या (Maharashtrachi Hasyajatra) माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणार लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवाली परब (shivali parab). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर लोकप्रियता मिळवणारी शिवाली आज 'छोटा पॅकेट, बडा धमाका’ या नावानेही ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात रहात असते. अलिकडेच शिवालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून यातील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिवाली कमालीची सुंदर दिसत आहे.

शिवालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ब्ल्यू कलरची साडी नेसली असून नाकात छान नथ घातली आहे. सोबतच "जो निगाह-ए-नाज़ का बिस्मिल नहीं है, वो दिल नहीं है, दिल नहीं है, दिल नहीं है", असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये दिसली. सुरुवातीला शिवालीने ‘हृदयात वाजे समथींगल’ या मालिकेमध्ये काम केलं आणि त्या नंतर शिवाली ‘बँक बँचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमहाराष्ट्राची हास्य जत्रा