Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसच्या इतिहासात न घडलेलं ग्रँड सेलिब्रेशन होणार! शिव ठाकरेच्या एन्ट्रीने रंगत वाढणार, बघा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 10:05 IST

शिव ठाकरेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली असून सर्वांना आनंद झालाय (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. हा सीझन संपायला शेवटचे सहा दिवस बाकी आहेत. रविवारी रितेश देशमुखच्या उपस्थितीत ग्रँड फिनाले रंगणार आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात विशेष पाहुण्यांची रेलचेल दिसणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आज शिव ठाकरे सहभागी होणार आहे. शिव ठाकरेच्या एन्ट्रीने बिग बॉस मराठीची रंगत चांगलीच वाढणार आहे.

शिव ठाकरेची बिग बॉस च्या घरात ग्रँड एन्ट्री

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत बिग बॉस घोषणा करतात की, "सदस्यांच्या आजवरच्या प्रवासाचे हटके सेलिब्रेशन होणार शिव ठाकरेसोबत". पुढे मग दार उघडलं जातं आणि शिव ठाकरेची घरात एन्ट्री होते. शिव ठाकरे बूट काढून बिग बॉसच्या जमिनीवर लोटांगण घालतो. पुढे शिव म्हणतो की, "एवढं भव्य दिव्य सेलिब्रेशन होणार जे आजपर्यंत बिग बॉसच्या इतिहासात कधीच झालं नाही." पुढे सूरज सर्वांशी हात मिळवतो. सूरजची गळाभेट घेत त्याला उचलून घेताना दिसतो.

शिवकडून सर्वांना मानाचा मुजरा

पुढे बिग बॉस मराठीच्या प्रोमोत बघायला मिळतं की शिव म्हणतो, "तुम्हा सर्वांना संपूर्ण महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा आणि सॅल्यूट. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला." असं म्हणताच सर्वजण टाळ्या वाजवतात. शिवच्या एन्ट्रीने घरात काय रंगत वाढणार हे आजच्या भागात पाहायला मिळेलच. दरम्यान काल निक्की सोडून घरातील उर्वरीत सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे मिड वीक एविक्शनमध्ये कोण बाहेर जाणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :शीव ठाकरेबिग बॉस मराठीअंकिता प्रभू वालावलकर