Join us

नेहा कक्करच्या बहिणीने भावंडांशी तोडलं नात, शिव ठाकरे म्हणाला- "माझी आई त्यांच्या कानाखाली मारुन..."

By कोमल खांबे | Updated: April 14, 2025 13:54 IST

गायिका सोनू कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करत बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्करशी नातं तोडल्याचं सांगितलं होतं. सोनू कक्करच्या या Sibling Divorce वर आता शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे. 

गायिका सोनू कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करत बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्करशी नातं तोडल्याचं सांगितलं होतं. तिच्या या पोस्टने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण, काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली. सोनू कक्करच्या या Sibling Divorce वर आता शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे. 

शिवने विरल भय्यानीशी बोलताना Sibling Divorce बद्दल त्याचं मत मांडलं. शिव म्हणाला, "खरं सांगायचं तर हे ऐकल्यानंतर मला हसू आलं. ते एक उत्तम आर्टिस्ट आहेत. Sibling Divorce काय असतं? बाकी घटस्फोटाच्या बातम्या काय कमी होत्या का की आता Sibling Divorce आलं. माझ्या आजी किंवा आईकडे त्यांना घेऊन गेलं तर दोघांच्या कानाखाली देतील. त्यांना सांगतील एकाने या कोपऱ्या बसा दुसऱ्याने त्या कोपऱ्यात...बोलायचं नाही तर नका बोलू पण भांडायचं नाही". 

"Sibling Divorce हा खूप मोठा शब्द आहे. असं होत नाही. या घरातल्या गोष्टी आहेत. घरातच ठेवल्या पाहिजे. तुम्ही भावंडं आहात. सोनू कक्करला वाटत होतं तर नेहाशी तिने बोलावं. ती धावत येईल. त्यांच्या घरातल्या गोष्टींवर आपण इथे फालतूमध्ये चर्चा करत बसलो आहोत. त्यांच्यातलं भांडण मिटलं नाही तर मी माझ्या आजी आणि आईला पाठवेन. त्यांचे कान पकडून त्या भांडण मिटवतील", असंही शिव पुढे म्हणाला. 

सोनू कक्करने पोस्टमध्ये काय म्हटलं होतं? 

"तुम्हा सर्वांना कळवताना खूप दु:ख होत आहे की यापुढे दोन टॅलेंटेड सुपरस्टार टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांची बहीण नसेन. भावनिक वेदनांमधून मी हा निर्णय घेतला आहे. आज मी खरोखरच दु:खी आणि निराश आहे". 

टॅग्स :नेहा कक्करशीव ठाकरेटिव्ही कलाकार