Join us
Daily Top 2Weekly Top 5

शहनाज गिल-सिद्धार्थ शुक्लाच्या मैत्रीवर डॅडी नाराज, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 16:12 IST

‘बिग बॉस 13’ घरात शहनाज प्रचंड लोकप्रिय झाली होती, सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

ठळक मुद्देबिग बॉस 13 फिनाले संपून काही तास होत नाहीत तोच शहनाजचे वडील संतोष सिंग चर्चेत आले होते.

बिग बॉस 13’मुळे प्रचंड चर्चेत आलेली अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.   वडिल संतोष सिंह गिल यांनी अलीकडे शहनाजसोबत न बोलण्याची शपथ घेतली होती. अर्थात यानंतर लगेच त्यांनी पलटी मारली होती. मी शहनाजवर खूप दिवस नाराज राहू शकत नाही, असे ते म्हणाले होते. आता संतोष यांनी शहनाज व सिद्धार्थ शुक्ला यांच्या मैत्रीबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती.टाईम्स आॅफ इंडियाला अलीकडे दिलेल्या मुलाखतीत संतोष सिंह गिल बोलले.

शहनाज व सिद्धार्थ मैत्रीबद्दल तुम्ही काय म्हणाल, असा प्रश्न त्यांना केला गेला. यावर मी यावर काहीही बोलणार नाही. ही तिची पर्सनल लाईफ आहे.  मी ना तिच्या व सिद्धार्थच्या मैत्रीच्या विरोधात आहे, ना या मैत्रीला माझा पाठींबा आहे.  माझा या मैत्रीचा विरोध नाही. तसेच त्यांनी सोबत राहावे अशीही माझी इच्छा नाही, असे शहनाजचे वडिल म्हणाले. मी डॅडी आहे. पण मला कोणी डॅडी समजेल तेव्हा ना. मला माझी मुलगी बाप समजत नसेल तर मी काय बोलणार, असेही ते म्हणाले.शहनाजने माझ्याशी बोलणे कमी केले आहे. माझ्यावर रेपचा आरोप लागला, तेव्हा तिने साधी माझी चौकशीही केली नाही. आपला डॅडी निर्दोष आहे, हे तिला ठाऊक होते. पण तिने मला साधा फोनही केला नाही, असे ते म्हणाले.

बिग बॉस 13’ घरात शहनाज प्रचंड लोकप्रिय झाली होती, सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

बिग बॉस 13च्या फिनालेनंतरही झाली होती चर्चाबिग बॉस 13 फिनाले संपून काही तास होत नाहीत तोच शहनाजचे वडील संतोष सिंग चर्चेत आले होते. ‘बिग बॉस 13’ फिनालेआधी या शोमधील स्पर्धक शहनाज गिलचे स्वयंवर होणार, अशी घोषणा करण्यात आली होती. बिग बॉसच्या घरातच ही घोषणा झाल्याने शहनाजच्या स्वयंवर कसे होणार, शहनाज कुणाच्या गळ्यात माळ घालणार, याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. पण यानंतर अचानक शहनाजचे वडील संतोष सिंग गिल यांनी लेकीच्या या स्वयंवराला कडाडून विरोध केला होता, ‘माझ्या मुलीला पंजाबची कतरीना कैफ म्हणून ओळखले जाते. पण चॅनल तिला राखी सावंत बनवण्याचे प्रयत्न करतेय. चॅनलने हे प्रयत्न थांबवले नाहीत तर प्रसंगी मी शिवसेनेची मदत घेईल,’ असे संतोष म्हणाले होते. अर्थात याऊपरही शहनाज गिलचा स्वयंवर शो झाला होता.

‘बिग बॉस 13’ची Ex Contestant शहनाज गिलचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, समोर आले नवीन फोटो

टॅग्स :शेहनाझ गिलसिद्धार्थ शुक्लाबिग बॉस