Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यासाठी नेत्राने घेतला मालिकेतून अल्पशा: ब्रेक; सांगितला नववर्षाचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 13:45 IST

Titeekshaa tawde: तितीक्षा लग्नानंतर तिचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत तितीक्षाने नेत्रा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. काही महिन्यांपूर्वीच तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता लग्नानंतर ही जोडी त्यांचा पहिला गुढीपाडवा सेलिब्रेट करणार आहे. त्यामुळेच तितीक्षाने तिचा नवंवर्षाचा प्लॅन सांगितला आहे.तितीक्षा लग्नानंतर तिचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार असल्यामुळे तिने यासाठी खास प्लॅन केला आहे. तितीक्षा तिच्या सासरी नाशिकला जाणार आहे. तसंच यावेळी ती कुटूंबासोबत तिचा वेळ घालवणार आहे. त्यामुळे तिने मालिकेतूनही खास गुढीपाडव्यासाठी सुट्टी घेतली आहे.

"गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आणि अर्थात तो मी खूप उत्साहात साजरा करणार आहे. लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे माझा. मी खास सुट्टी घेतली आहे. गुढीपाडवा साजरा करण्यासाठी मी सासरी जाणार आहे माझं सासर नाशिकच आहे. सिद्धार्थ आणि मी तिथे जाऊ आणि सुंदरशी गुढी उभारू, गोडाधोडाचं खाऊ, सासू सासऱ्यांसोबत वेळ घालवू कारण ते नाशिकला असतात आणि आम्ही मुंबईमध्ये, असं तितीक्षाने यावेळी म्हटलं. 

टॅग्स :तितिक्षा तावडेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार