Join us

'सारं काही तिच्यासाठी’ फेम श्रीनूला मिळाली रिअर लाइफ ओवी; अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 14:43 IST

Abhishek gaonkar: कोण आहे अभिनेता अभिषेक गांवकरची रिअल लाइफ ओवी?

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार त्यांच्या भावी जोडीदारासोबत साताजन्माच्या गाठी बांधत आहेत. यामध्येच सारं काही तिच्यासाठी फेम अभिनेत्यानेही खऱ्या आयुष्यात नुकताच साखरपुडा केला आहे. त्याच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सारं काही तिच्यासाठी या मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याच्या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

अभिषेकने डिजिटल क्रिएटर असलेल्या सोनल गुरव हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांची एंगेजमेंट पार पडली. सोनल आणि अभिषेक बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी साखरपुडा केला.

दरम्यान, अभिषेकने 'रात्रीस खेळ चाले', 'सुख म्हणजे नक्की काय असतं,' 'माझी माणसं', 'हंडरेड डेज' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :मराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकार