Join us

Sankarshan Karhade : गुंडांचा हल्ला? अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला दुखापत; पोस्ट करत म्हणाला, "परवा रात्री..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 16:20 IST

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने त्याचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. यात त्याच्या एका हाताला पट्टी बांधलेली दिसून येतीये.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) सध्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त असतो. त्याच्या सोशल मीडियावर सतत नाटकाचे अपडेट्स येत असतात. अशात आता त्याने नुकतीच केलेली एक पोस्ट बघून चाहत्यांना धक्काच बसला आहे. संकर्षणच्या हाताला लागलं असून पट्टी बांधलेली दिसते. इतकंच नाही तर गुंडांनी हल्ला केल्याचंही त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय. त्यामुळे चाहते संभ्रमात पडलेत.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने त्याचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. यात त्याच्या एका हाताला पट्टी बांधलेली दिसून येतीये. नक्की झालं तरी काय हे सांगत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले,"परवा रात्री माझ्यावर ४ (चार) गुंडांनी हल्ला केला..मी त्यांच्याशी २ (दोन) हात केले ..त्यात माझा १ (एक) हात जखमी झालाय..ह्याची तुम्हाला ० (शुन्य) कल्पना होती म्हणुन हा फोटो पोस्ट करतोय.."

आता संकर्षणने हे गंमतीत लिहिल्याचं स्पष्ट कळतंय. त्याला काहीशी दुखापत झाली असून म्हणून त्याने पट्टी बांधली आहे. 'काळजी घे रे' असं चाहते त्याला म्हणत आहेत. तसंच त्याच्या विनोदबुद्धीचंही चाहत्यांनीही कमेंट्समध्ये कौतुक केलंय. अभिनेत्री स्पृहा जोशीने 'मस्त रे' अशी कमेंट केली आहे. संकर्षण सध्या 'नियम व अटू लागू' नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे.

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारनाटक