मराठी कलाविश्वात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी या नवीन वर्षात त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. नुकतंच 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने सप्तपदी घेत अभिनेता अंशुमन जोशीसोबत लग्नगाठ बांधली. अपूर्वानंतर आता आणखी एक जोडी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक संदीप खरे यांची लेक आणि अभिनेत्री रुमानी खरे हिचा विवाहसोहळा पार पडला आहे. रुमानीने अभिनेता स्तवन शिंदेसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच स्तवन आणि रुमानी यांचा साखरपुडा झाला होता. सोशल मीडियावर त्यांनी प्रेमाची कबुली दिली होती. आता त्यांनी लग्न करत कायम एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ८ मार्च रोजी स्तवन आणि रुमानी यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. मोठ्या दणक्यात रुमानी आणि स्तवनचं लग्न पार पडलं. स्तवनने लग्नसोहळ्यातील काही खास क्षणांची झलक ही त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नासाठी रुमानीने खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर स्तवनने सूट परिधान केला होता. फेटा बांधल्याने तो राजबिंडा दिसत होता. रुमानीने 'तू तेव्हा तशी' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर रुमानी 'दुर्गा' मालिकेत झळकली. तर स्तवन शिंदे स्टार प्रवाहच्या 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेत झळकला होता. 'जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतही त्यानं काम केलं होतं.
Web Summary : Marathi singer Sandeep Khare's daughter, actress Rumani Khare, married actor Stavan Shinde on March 8th. The couple, who were recently engaged, celebrated their wedding in a grand ceremony. Rumani is known for her roles in 'Tu Tevha Tashi' and 'Durga', while Stavan has appeared in 'Tumcha Amcha Same Asta' and 'Jai Bhavani Jai Shivaji'.
Web Summary : मराठी गायक संदीप खरे की बेटी, अभिनेत्री रुमानी खरे ने 8 मार्च को अभिनेता स्तवन शिंदे से शादी कर ली। हाल ही में सगाई करने वाले इस जोड़े ने एक भव्य समारोह में अपनी शादी का जश्न मनाया। रुमानी 'तू तेव्हा तशी' और 'दुर्गा' में अपनी भूमिकाओं के लिए जानी जाती हैं, जबकि स्तवन 'तुमचा आमचा सेम असत' और 'जय भवानी जय शिवाजी' में दिखाई दिए हैं।