Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 16:33 IST

संभावना सेठने व्यक्त केलं दु:ख

भोजपुरी, हिंदी अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavna Seth) सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. तिचे व्लॉग सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऑडियन्स तिचे व्लॉग खूप एन्जॉय करतात. मात्र संभावनाच्या चेहऱ्यावरील हास्यामागे दु:खही आहे. मूल होत नाही म्हणून तिला अनेकदा टोमणे ऐकावे लागतात. नुकतंच तिने एका मुलाखतीत हा खुलासा केला.

संभावना सेठला आई व्हायचं आहे मात्र तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिला पावलोपावली टोमणे ऐकावे लागत आहेत. देबिना बॅनर्जीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, "लोकांनी मला हसताना खेळताना पाहिलं आहे. गोरखपूर गावातील लग्नात मी एकदम मस्त नाचत आहे. पण यामध्येही काही महिला होत्या ज्यांना मी कधीच विसरु शकत नाही. एक आली आणि म्हणाली, 'मला वाटतं आता तरी तुला मूल झालं पाहिजे. करच.' मी म्हणलं, 'अरे अम्मा होणार असतं तर आधीच नसतं झालं? नाही होत आहे.' तर ती म्हणाली, "जर काही प्रॉब्लेम असेल तर सांग ना. तुझी सासू बघ कशी एकटीच बसलेली असते. तिच्याबद्दल विचार कर. "

ती पुढे म्हणाली,"अरे मला मूल होत नाही आणि माझ्या सासूचा काय संबंध? तू आहेस कोण? ती गावातली कोणीतरी शेजारची महिला होती. घरचीही नव्हती. एक महिला असूनही तुम्ही माझ्याबद्दल असा विचार कसा करता. मला आर्थ्रायटीस आहे. मी बाहेरुन चांगली दिसते पण मनातून आजारी आहे. मी आयव्हीएफचाही प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही. मी खूप वाईट काळातून गेले आहे. आता मी सगळं देवावर सोडलं आहे."

संभावना ४३ वर्षांची आहे. २०१६ मध्ये तिने लेखक अविनाश द्विवेदीसोबत लग्न केलं. ती पतीहून ५ वर्षांनी मोठी आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारबॉलिवूड