Join us

Photo: पशाला मिळाली रिअल लाइफ अंजीची साथ; रुचिका धुरीसोबत पार पडला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 11:32 IST

akash nalawade: सध्या सोशल मीडियावर अभिनेता आकाश नलावडे याच्या साखरपुड्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' (sahkutumb sahaparivar) . उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली. त्यातच अंजी, पशा, सुर्या,सरु या प्रत्येक कलाकाराने त्यांच्या स्वतंत्र असा चाहतावर्ग तयार केला आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील अंजी आणि पशा यांच्या जोडीला तर प्रेक्षकांनी कमालीची प्रेम दिलं आहे. परंतु, आता मालिकेतील पशाला त्यांच्या खऱ्या आयुष्यातील अंजी भेटली आहे. नुकताच पशाने त्याच्या रिअल लाइफ पार्टनरसोबत साखरपुडा केला आहे.

सध्या सोशल मीडियावर अभिनेता आकाश नलावडे (akash nalawade) याच्या साखरपुड्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये त्याने रुचिका धुरीसोबत साखरपुडा केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या शुभप्रसंगी सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकारांनीही हजेरी लावल्याचं दिसून आलं.

दरम्यान, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत आकाश नलावडे याने पशाची  भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांनी अल्पावधीत लोकप्रिय केलं. त्यामुळे पशा म्हणजेच आकाश सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. आकाशनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे त्याने आणि रुचिकाने यावेळी एकत्र रोमॅण्टिक डान्सदेखील केल्याचं पाहायला मिळत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार