Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी खूप प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ गेले..', जुही परमारसोबत झालेल्या घटस्फोटावर अभिनेता सचिन श्रॉफनं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 12:17 IST

जुही आणि सचिनने शाही थाटात लग्न केलं होतं. एक दिवस अचानक त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली आणि चाहत्यांना धक्का बसला होता.

सचिन श्रॉफ आणि जुही परमार टीव्हीवरील पॉवर कपल म्हणून ओळखलं जायचे. चाहते त्यांच्याकडे आदर्श जोडी म्हणून पाहायचं. पण एक दिवस अचानक दोघांचे रस्ते वेगळे झालं ज्याचे कारण कुणालच कळलं नाही. यानंतर सचिनने काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.   

15 फेब्रुवारी २००९मध्ये जुही आणि सचिनने शाही थाटात लग्न केलं होतं. त्यांचं हा लग्नसोहळा राजस्थानमध्ये झाला होता. २०१३मध्ये दोघांना कन्यारत्न झालं. पण एक दिवस अचानक त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली आणि चाहत्यांना धक्का बसला. घटस्फोटानंतर मुलीची कस्टडी जुहीला मिळाली. यादरम्यान चाहत्यांना एकच प्रश्न पडला होता दोघांच्या वेगळं होण्याचं कारणं नेमकं काय आहे?  

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता सचिन श्रॉफने सांगितले होते की त्यांच्या नात्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे जुही परमारचे त्याच्यावर प्रेम नव्हते. अभिनेता म्हणतो की, त्याने जुहीला खूश ठेवण्याचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ गेलं. त्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. 

राजीव खंडेलवाल याच्या शोमध्ये अभिनेत्रीने जुहीनं ही गोष्ट स्वत: कबुल केली. अभिनेत्रीने सांगितलं होते की, ‘मी सचिनला लग्नापूर्वीपासून ओळखत होती. पण  तिने कधी त्याला डेट नाही केली. सचिनने तिला लग्नासाठी विचारलं आणि जुहीने लगेच लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघांचं मोठं भांडण झाल्याचं अभिनेत्रीने यावेळी सांगितलं होतं. जुही म्हणाली, त्याचं माझ्यावरचं प्रेम पाहून मीही लग्नाला तयार झाले. मला वाटलं होतं की मीही त्याच्यावर प्रेम करायला लागेन. मला नाही वाटत मी त्या लग्नाला लव्ह मॅरेज म्हणू शकेन.’ 

टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोट