Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 13:35 IST

नंतर रुबिनाने जे केलं ते पाहून तिचं कौतुकही होत आहे.

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik)  नुकतीच आई झाली आहे. तिने गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. लेकींच्या जन्मानंतर रुबिनाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे. ती पुन्हा कमालीची फीट झालेली दिसत आहे. नुकतंच रुबिनाने एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला. यावेळी रॅम्पवर चालताना तिचा तोल गेला आणि ती पडता पडता वाचली. नंतर रुबिनाने जे केलं ते पाहून तिचं कौतुकही होत आहे.

रुबिना आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत असते. प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात ती चांगलं बॅलन्स करत आहे. नुकतंच ती एका फॅशन शोमध्ये सहभागी झाली. यावेळी तिने गुलाबी लेंहेंगा परिधान केला होता. त्यावर स्ट्रॅपलेस ब्लाईड घातला होता. या लेहेंग्यात ती खूप सुंदर दिसत  होती. रुबिना रॅम्प वॉक करताना तिचा तोल गेला आणि ती पडता पडता वाचली. यानंतर तिने पायातील हिल्स बाजूला काढल्या आणि चालायला लागली. तिच्या अॅटिट्यूडचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.   

रुबिनाने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला. ईधा आणि जीवा अशी त्यांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना त्यांचा चेहरा दाखवला. रुबिना 'किसी ने बताया नही' नावाचं पॉडकास्टही करते. यात तिने अनेक कलाकारांशी संवाद साधला. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियाट्रोल