Join us

'खरं तर मला हे बोलायला नकोय. पण..' प्रेग्नंसी काळात सर्जरी केली म्हणणाऱ्यांना रुबिनाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 13:18 IST

Rubina dilaik: रुबिनाने ओठांची आणि गालाची सर्जरी केल्याचं काही जणांनी म्हटलं आहे. त्यामुळे या ट्रोलर्सला आता अभिनेत्रीने उत्तरं दिलं आहे.

bigg boss 14 फेम रुबिना दिलैक (Rubina dilaik) सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत येत आहे. लवकरच रुबिना जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. त्यामुळे ती आता तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे. मात्र, या प्रेग्नंसी पिरिअडमध्ये तिच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्या दिसण्यावरुनही तिला ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर तिने चेहऱ्यावर सर्जरी केलीये असंही काही जणांनी म्हटलं. त्यामुळे या ट्रोलर्सला आता रुबिनाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर रुबिना तिच्या प्रेग्नंसी काळातील अनेक फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यात तिचे काही फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. रुबिनाने ओठांची आणि गालाची सर्जरी केल्याचं काही जणांनी म्हटलं आहे. त्यामुळे रुबिनाने तिच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. सोबतच प्रेग्नंसी काळात स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयीदेखील भाष्य केलं आहे.

"खरं तर मला हे बोलायला नकोय. पण, लोकांनी माझ्या पोस्टवर कमेंट करायला सुरुवात केली की, हे पाहा तिने लीप जॉब केलंय. गाल वर यावेत यासाठी सर्जरी केलीये. अरे..पण मी असं काहीच केलेलं नाहीये. ही माझ्या चेहऱ्यावर आलेली सूज आहे. तुम्हाला कसं समजावू आता. हे सगळं फार निराशाजनक आहे. त्यामुळे मी माझं कमेंट सेक्शनच बंद करुन टाकलं", असं रुबिना म्हणाली.

दरम्यान, रुबिनाने सप्टेंबर २०२३ तिच्या प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना दिली. २०१८ मध्ये रुबिनाने अभिनेता अभिनव शुक्लासोबत लग्नगाठ बांधली होती. शिमलामध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न झालं होतं.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार