Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्रेग्नंसीमध्ये जवळच्या लोकांनीच फसवलं'; रुबिना दिलैकला प्रेग्नंसी काळात आला वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:28 IST

Rubina dilaik: रुबिनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री जन्नत जुबैरसोबत चर्चा करतांना दिसत आहे. यावेळी रुबिनाने तिच्या प्रेग्नंसीचा अनुभव शेअर केला.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री  म्हणजे रुबिना दिलैक. छोटी बहू या मालिकेच्या माध्यमातून तिला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यामुळे आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यावरही उघडपणे भाष्य करणाऱ्या रुबिनाने अलिकडेच तिच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं.

रुबिनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने प्रेग्नंसी काळात तिला आलेल्या अडचणी, लोकांचे बदलले व्यवहार या सगळ्यावर भाष्य केलं. इतकंच नाही तर वेळप्रसंगी आपले म्हणणाऱ्या लोकांनीच पाठ फिरवली, असंही तिने यावेळी सांगितलं. रुबिनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री जन्नत जुबैरसोबत चर्चा करतांना दिसत आहे. यावेळी रुबिनाने तिच्या प्रेग्नंसीचा अनुभव शेअर केला.

''मी एकदम प्रामाणिकपणे सांगते, माझे काही मित्र-मैत्रिणी असे होते ज्यांनी कायम मला सोबत असण्याचं आश्वासन दिलं होतं. ते माझ्यासोबत पार्टी वगैरे पण करायला यायचे. ते माझ्या चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीमध्ये माझ्या सोबत होते. परंतु, मला ज्यावेळी त्यांची खरोखर खूप जास्त गरज होती त्यावेळी ते माझ्यासोबत नव्हते. मला माझ्या प्रेग्नंसीवेळी त्यांची गरज होती. पण, ते त्यावेळी आलेच नाहीत. आणि, त्याक्षणी मी त्यांच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले,'' असं रुबिना म्हणाली.

पुढे ती म्हणते, ''आई झाल्यानंतर मला अनेक मानसिक त्रास सहन करावा लागला. मी त्यावेळी कित्येकदा रात्री रडत बसायचे. त्यावेळी मला त्या मित्र-मैत्रिणींची गरज होती. पण, त्याच जवळच्या लोकांनी मला फसवलं. त्यावेळी फक्त माझा नवरा अभिनवच माझ्यासोबत होता. मला या सगळ्या पोस्टपार्टमच्या त्रासातून त्यानेच मला बाहेर काढलं.'' दरम्यान, रुबिना जुळ्या मुलींची आई आहे. तिने २०२३ मध्ये जीवा आणि एधा या दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Rubina Dilaik felt betrayed by close friends during pregnancy.

Web Summary : Rubina Dilaik revealed her pregnancy struggles, feeling let down by friends who'd promised support. She faced postpartum issues, relying solely on her husband, Abhinav, for support after the birth of her twin daughters.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकारप्रेग्नंसी