Join us

-तर मग ‘रंग माझा वेगळा’ सीरिअल का सोडली? चिमुकल्या साइशा भोईरचे आईवडील ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 12:31 IST

Saisha Bhoir : होय, साइशाच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रोमो रिलीज होताच साइशाचे पालक सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत...

विविध मराठी मालिकांमध्ये सध्या बालकलाकार काम करत आहेत. साइशा भोईर (Saisha Bhoir ) ही अशीच एक बालकलाकार. टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली ‘रंग माझा वेगळा’ ( Rang Maza Vegla) या मालिकेत साइशाने चिमुकल्या कार्तिकीची भूमिका साकारून सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. कार्तिकीच्या भूमिकेने तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. पण आता साइशाने ही मालिका सोडली आहे. इतकंच नाही तर ही मालिका सोडल्या सोडल्या तिच्या नव्या मालिकेचा प्रोमोही रिलीज झाला आहे आणि हा प्रोमो रिलीज होताच साइशाचे पालक सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

 ‘रंग माझा वेगळा’  मालिका एका महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच  कार्तिकी साकारणारी चिमुरडी मालिका सोडत असल्याचे वृत्त समोर आल्यानं चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. साइशाच्या आईने साइशाच्या शाळेचं कारण देत ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सोडल्याचं सांगितलं होतं.

मालिकेच्या शूटींगसाठी साइशाला जाण्यासाठी 2 तास आणि येण्यासाठी 2 तास असा वेळ लागतो. त्यामुळे साइशा तिची शाळा बुडत होती. ती शाळा मिस करत होती. तिचं लहानपण आम्हाला हिरावून घ्यायचं नव्हतं, असं साइशाची आई म्हणाली होती. मात्र नुकताच साइशाच्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला. झी मराठीवर ‘नवा गडी नवं राज्य’ ( Nava Gadi Nava Rajya) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय आणि या मालिकेत साइशा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर साइशाच्या आईबाबांना ट्रोल केलं जात आहे.

तुम्ही बोलत होता की शाळेत जावं लागेल म्हणून ‘रंग माझा वेगळा’ ही सीरिअल सोडली साइशानी. मग आता तर ती दुसऱ्या सीरिअलमध्ये आली पण... आली ती चांगली गोष्ट आहे, पण मग शाळा? अशी कमेंट करत एका चाहत्याने साइशाच्या आईबाबांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. साइशाच्या पालकांनी शाळा आणि अभ्यासाचं कारण दिलेलं ‘रंग माझा वेगळा’ सोडताना. शिक्षणाचं निमित्त सांगून किंवा शाळेच्या नावाखाली खोटं कसे काय बोलतात लोक, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. शेवटी सीरिअलमध्येच काम करायचं होतं तर मग रंग माझा वेगळा ही सीरिअल का सोडली? असा सवाल एका चाहत्याने केला आहे.

साइशाच्या आईबाबांनी दिलं स्पष्टीकरणसोशल मीडियावर ट्रोल होताना बघून साइशाच्या आईने स्पष्टीकरण दिलं आहे.नव्या मालिकेचं शूटींग घरापासून जवळ आहे. तसेच आठवड्यातून केवळ तीनच दिवस शूटींग असणार आहे, असं साइशाच्या आईने स्पष्ट केलं आहे.साइशाची नवी मालिका येत्या ८ ऑगस्ट पासून सुरू होतेय. या मालिकेत  पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परूळेकर, वर्षा दांदळे मुख्य भूमिकेत आहेत.   

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार