Join us

'ढोलिडा'वर दीपाने केला जबरदस्त डान्स; पाहा रेश्मा शिंदेचा 'हा' भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 10:57 IST

Rang maza vegla: कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रेश्माने अलिकडेच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

'रंग माझा वेगळा' (rang maza vegla) या मालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. या मालिकेत रेश्माने दीपा ही भूमिका साकारुन अल्पावधीत प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यामुळे सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ती अग्रस्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रेश्माने तिचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. विशेष म्हणजे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम प्रयत्नदेखील करते. 

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रेश्माने अलिकडेच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिची सहकलाकार पूजा बिरारी हिच्यासोबत डान्स करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एकही ट्रेंड रेश्मा सोडत नाही. ती प्रत्येक ट्रेंड फॉलो करत असते. त्यामुळे यावेळी तिने 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातील ढोलिडा या गाण्यावर डान्स करत ट्रेंड फॉलो केला आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये रेश्मा आणि पूजा यांनी ऑफ व्हाइट रंगाची गुजराती स्टाइलमध्ये साडी नेसली आहे. यापूर्वीही रेश्माने अनेक ट्रेंड फॉलो केले आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावर कायम चर्चा होत असते.

टॅग्स :रेश्मा शिंदेसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमाआलिया भटबॉलिवूड