Join us
Daily Top 2Weekly Top 5

रंगात न्हाऊन निघाली 'रामायणा'तील सीता; दिपिका चिखलिया यांनी शेअर केला डान्स व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:30 IST

Dipika chikhlia: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिपिका यांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रामानंद सागर यांची ‘रामायण’ (Ramayan) ही मालिका एकेकाळी तुफान लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे मध्यंतरी पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यामुळे या मालिकेतील कलाकार सध्या पुन्हा चर्चेत आले आहेत. या मालिकेत सीतेची भूमिका अभिनेत्री दिपिका चिखलिया यांनी साकारली होती. दिपिका यांचा कलाविश्वात फारसा वावर नसला तरीदेखील सोशल मीडियावर त्या चांगल्याच अॅक्टीव्ह आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिपिका यांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. होळीच्या दिवशी रंगात न्हाऊन निघालेल्या दिपिका यांनी हातात फुलं आणि रंग घेऊन डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळत आहे.

दरम्यान,80 च्या दशकात आलेल्या ‘रामायण’ या मालिकेइतकी लोकप्रियता क्वचितच कुण्या मालिकेला मिळाली असेल. या मालिकेतील कलाकारांना आजही अनेक लोक देवासारखे मानतात. या मालिकेत अरूण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली होती. तर दिपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका वठवली होती. 

टॅग्स :सेलिब्रिटीहोळी 2023टेलिव्हिजन