Join us

रावणाची दहा डोकी लावली अन् 'छम्मक छल्लो'वर नाचली; राखी सावंतचा नवीन व्हिडीओ, तुम्हाला हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:00 IST

राखी सावंतने दसऱ्यानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे

'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) दुबईहून पुन्हा एकदा आपल्या विनोदी अंदाजात मायदेशी आली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राखी सावंतने मुंबईच्या रस्त्यांवर रावणाचा वेश धारण करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या या हटके अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा रंगली. इतकंच नव्हे, राखी सावंतने रावणाचा वेश धारण करत 'छम्मक छल्लो' या गाण्यावर डान्स केला आहे. जाणून घ्या.

राखीचा रावणाचा लूक आणि डान्स

दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने राखी सावंत रावणाच्या वेशभूषेत दिसली. तिने रावणासारखी १० कृत्रिम डोकी लावली होती. काळ्या रंगाचे कपडे परिधान करून तिने मिशा आणि खास मेकअप केला होता. हातात गदा घेऊन रावणाप्रमाणे जोरदार हसून ती सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत होती. यावेळी राखीने अचानक शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) लोकप्रिय 'छम्मक छल्लो' गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली. रावणाच्या वेशात तिचा हा डान्स पाहून रस्त्यावर उपस्थित असलेले लोक हसून लोटपोट झाले.

चाहते काय म्हणाले?

राखी सावंतने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्यावर युजर्सच्या भरभरून कमेंट्स येत आहेत. राखीच्या या एंटरटेनिंग स्टाईलमुळे नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट केली, "हे फक्त राखीच करू शकते!" तर दुसऱ्याने म्हटले, "राखी तू बेस्ट आहेस यार." अशा कमेंट्स तिच्या व्हिडिओवर येत आहेत. राखी सावंत नुकतीच दुबईतून परतली आहे. आईच्या निधनानंतर ती खूप दुःखी आणि एकटी पडली होती, मात्र मुंबईत परतताच तिने पुन्हा एकदा आपल्या खास अंदाजात चाहत्यांचं मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rakhi Sawant's Ravana Look and 'Chammak Challo' Dance Goes Viral!

Web Summary : Rakhi Sawant, dressed as Ravana with ten heads, danced to 'Chammak Challo' on Mumbai streets during Dussehra. Her entertaining style and unique performance drew laughter and positive reactions from the public and social media users, marking her return after a period of mourning.
टॅग्स :राखी सावंतदसरारामायणबॉलिवूडदुबईभारतबिग बॉस १९