Television Serial: छोट्या पडद्यावरील मालिका आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नातं निर्माण झालेलं असतं. त्यामुळे एखाद्या मालिकेच्या वेळेत किंवा इतर काही बदल झाला तर त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो. मालिकांमधील या बदलांमुळे अनेकदा प्रेक्षक देखील नाराज होतात. त्यात आता एका लोकप्रिय मालिकेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मालिका ऑफ एअर होणार आहे. त्यामुळे मालिकारसिक नाराज झाले आहेत. या मालिकेचं नाव 'शिवा' आहे. नुकताच 'शिवा' म्हणजेच अभिनेत्री पुर्वा कौशिकने सोशल मीडियावर सेटवरील फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, 'शिवा' मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांची मालिकेत प्रमुख भूमिका होती. जवळपास दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर 'शिवा' मालिका लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्री अपूर्वा कौशिकने तिच्या इन्स्टाग्राम स्टोवर शिवा मालिकेच्या सेटवरील शूटिंगचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याला भावुक कॅप्शन देत अभिनेत्रीने लिहिलंय की, "वन लास्ट टाईम विथ रिअल फाईटर्स... ", या फोटोंमध्ये अभिनेत्री मालिकेच्या प्रोडक्शन टीमसोबत दिसते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 'शिवा' मालिकेचा शेवटचा भाग ८ ऑगस्टला प्रसारित केला जाईल. ४९१ भागांसह ही मालिका सर्वांचा निरोप घेईल. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत. अशातच येत्या ११ ऑगस्टपासून झी मराठी वाहिनीवर तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली वीण दोघातली तुटेना ही मालिका सुरु होतेय. शिवा मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री ९: ३० च्या वेळेत प्रसारित केली जाते. आता त्याच वेळेत तारिणी ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार पाहायला मिळणार आहे.