Join us

'पुन्हा कर्तव्य आहे' नवी मालिका लवकरच; मुख्य भूमिका साकारणाऱ्या जोडीला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 14:57 IST

Tv serial: या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याने अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, अभिनेत्रीने सुद्धा मराठी कलाविश्वात बऱ्याच प्रोजेक्टमध्ये काम केल्याचं सांगण्यात येतं. तुम्ही ओळखलंय का या दोघांना?

झी मराठीवर सध्या अनेक मालिकांची रेलचेल सुरु आहे. अनेक नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच सध्या 'पारु', 'शिवा', 'नवरी मिळेल हिटलरला' या  तीन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. विशेष म्हणजे या मालिकांमध्ये आता आणखी एका नव्या टीव्ही शोची भर पडली आहे. लवकरच झी मराठीवर 'पुन्हा कर्तव्य आहे' ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला 

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अपूर्ण 'ती' अपूर्ण 'तो' नव्या आयुष्याची वाट पाहे अशी टॅगलाइन असलेल्या या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत अभिनेता अक्षय म्हात्रे हा मुख्य भूमिका साकारणार असून अभिनेत्री अक्षया हिंदाळकर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. शैलेश डेरे दिग्दर्शित या मालिकेची निर्मिती टेल अ टेल मीडियाने केली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार