Join us

विरह सहन होईना! प्राजक्ताला झालं तरी काय? नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 13:05 IST

उदासीन चेहरा, थोडंही हसू नाही, हरवलेल्या अवस्थेत प्राजक्ताने फोटो शेअर केलेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल आणि तिचे सोशल मीडियावरील फोटो कायम व्हायरल होत असतात. लाडक्या प्राजूचं नवं फोटोशूट म्हटलं की लगेच त्यावर कमेंट्सचा भडिमार सुरु होतो. नुसते फोटोच नाही तर त्याखाली प्राजक्ताने दिलेलं कॅप्शनही फारच इंटरेस्टिंग असतं. तर आता प्राजूने केशरी रंगाच्या साडीत दोन फोटो पोस्ट केले आहेत. प्रियकरासोबतच्या विरहावर लिहिलेल्या या चार ओळी आहेत.

केशरी रंगाची साडी आणि जांभळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज या लुकमध्ये प्राजक्ता नेहमीसारखीच सुंदर दिसतेय. मात्र तिच्या चेहऱ्यावर काहीशी उदासीनताही दिसून येते. चेहऱ्यावर थोडंही हसून नाहीए. कोणाच्यातरी आठवणीत ती हरवून गेली आहे. प्राजक्ताने फोटोखाली कॅप्शन देत लिहिले, 'तुम्हें याद करते करतेजायेगी रैन सारी..।तुम ले गये हो अपनेसंग नींद भी हमारी..।यासोबतच विरहगीत असं हॅशटॅगही तिने दिलं आहे.

प्राजक्ताला काय झालं असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र तिच्या या कॅप्शनवरुन नेटकऱ्यांनी तिची फिरकीच घेतली आहे. 'प्राजू, उन्हाळा सुरु झालाय म्हणून झोप येत नसेल', 'उन्हाळा आहे त्वचेची काळजी घे, बिना फिल्टरची बरी दिसत नाही तू', 'अच्छा म्हणून डोळ्याखाली डार्क सर्कल येतात' असे भन्नाट कॅप्शन तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी केलेत.

"आजकालचं प्रेम म्हणजे 'रडायला खांदा' पण माझ्यासाठी मात्र..."; प्राजक्ता माळीने हिशेबच करून टाकला!

सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचे सूत्रसंचालन करत आहे. हास्यजत्रेच्या कलाकारांसोबतच प्राजक्ताला देखील या शोमुळे प्रसिद्धी मिळत आहे. नुकतंच प्राजक्ताने एका मुलाखतीत तिचे ब्रेकअप झाल्याचाही खुलासा केला होता. तर आता तिच्या या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.  

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेताटिव्ही कलाकारव्हायरल फोटोज्