Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: वाहता झरा, धबधबे अन् बरंच काही! प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत लुटला निसर्गाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:11 IST

तिने काही दिवसांपूर्वीच कर्जतला निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर फार्महाऊस खरेदी केलंय.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) काही दिवसांपूर्वीच निसर्गाच्या कुशीत फार्महाऊस खरेदी केलं. स्वकष्टातून तिने कर्जतला निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर फार्महाऊस घेतलं. त्याचे फोटो तिने नुकतेच पोस्ट केले होते. स्वत:ची एक प्रॉपर्टी घेण्याचं तिचं स्वप्न होतं जे तिने आता पूर्ण केलं आहे. कर्जतला फार्महाऊसजवळच असलेल्या धबधबे आणि वाहत्या झऱ्याचा आनंद घेताना प्राजक्ताने काही फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ता नेहमी तिच्या कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत असते. तिला दोन छोट्या भाच्या आहेत ज्यांच्यासोबत तिची मस्ती सुरु असते. 'निसर्ग तुम्हाला प्रफुल्लित करतो, पण कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद घेणे यापेक्षा चांगली थेरपी दुसरी कुठलीच नाही.' असं छानसं कॅप्शन तिने दिलं आहे. या फोटोत प्राजक्ता झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत आहे. तर संपूर्ण कुटुंबासोबत तिने एन्जॉय करतानाचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. 

प्राजक्ताच्या या पोस्टवर नेहमीप्रमाणे चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. 'जलपरी','अस्सल मराठी स्वॅग' असे कमेंट्स केले आहेत. तर एकाने थेट तिला 'लग्न करशील का?' असं विचारलंय. प्राजक्ताचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाच्या शूटला सुरुवात केली आहे. 'वाह दादा वाह' म्हणत ती पुन्हा सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीकर्जतपरिवारव्हायरल फोटोज्