Television: छोट्या पडद्यावरील मालिका अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मात्र, त्यातील काही मोजक्याच मालिका काळाच्या ओघातही स्मरणात राहतात. त्यापैकीच एक मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेप्रमाणे त्यातील कलाकारांनी सुद्धा प्रेक्षकांना आपलंसं केलं. मालिका संपली असली तरी मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
दरम्यान, या मालिकेत देशमुखांच्या घरात मदतनीस म्हणून काम करणारी विमल हे पात्र देखील लक्षवेधी ठरलं होतं. ही भूमिका अभिनेत्री सीमा घोगळेने साकारली होती. तिच्या भूमिकेचं फार कौतुक झालं.अशातच आता या अभिनेत्रीची स्टार प्रवाहच्या आगामी मालिकेत वर्णी लागली आहे.येत्या २७ एप्रिलपासून स्टार प्रवाह वाहिनीवर बाई तुझा आशीर्वाद ही नवोकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका आगळ्या-वेगळ्या कथानकामुळे ही मालिका चर्चेत आलीये. या मालिकेत अभिनेत्री सीमा घोगळे झळकणार आहे. बाई तुझा आशीर्वाद मालिकेमध्ये ती अवनीच्या आई म्हणजेच संगीता देशमाने ही भूमिका वठवताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक झाले आहेत.
वर्कफ्रंट
अभिनेत्री सीमा घोगळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘इंद्रायणी’, ‘आई कुठे काय करते’, ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’, ‘गोठ’, या मालिकांतून ती घराघरांत पोहोचली. तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता नव्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Web Summary : Seema Ghogale, known as Vimal from 'Aai Kuthe Kay Karte', will star in Star Pravah's 'Bai Tuza Aashirwad' as Avani's mother. She has previously worked in several popular Marathi TV serials.
Web Summary : 'आई कुठे काय करते' की विमल के रूप में प्रसिद्ध सीमा घोगले, स्टार प्रवाह के 'बाई तुझा आशीर्वाद' में अवनी की माँ की भूमिका निभाएंगी। उन्होंने पहले भी कई लोकप्रिय मराठी टीवी धारावाहिकों में काम किया है।