Join us

पूनम पांडे लग्न करतेय? दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 10:59 IST

पूनमचे देशभरात लाखो चाहते आहेत.

Poonam Pandey: मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे आपल्या बोल्ड लूक्समुळे कायम चर्चेत असते. पूनम तिच्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. पूनमचे देशभरात लाखो चाहते आहेत. कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहणारी पूनम सध्या सिंगल आहे. पुनमचं याआधी लग्न झालं होतं. तिने २०२० मध्ये बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. पण, काही काळानंतर ते वेगळे झाले. आता अभिनेत्रीनं दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

पूनमचं पहिलं लग्न ​​हे लग्न खूपच कमी काळ टिकलं होतं. गोव्यात हनिमून दरम्यान विनयभंग, धमक्या आणि मारहाणीचे आरोप तिने सॅमवर केले होते. यानंतर गोवा पोलिसांनी त्याला अटक केली होती. डोक्यावर, डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्यामुळे पूनमलाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता नुकतंच पूनमनं दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलंय.  इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना पूनम म्हणाली, "मी दोन वर्षांपासून सिंगल आहे आणि माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे.  मला वाटते की मी या बाबतीत दुर्दैवी आहे, परंतु मी खूप आनंदी आहे. माझं एक सुंदर कुटुंब आहे आणि एक सुंदर करिअरही आहे. मी त्यात आनंदी आहे. पुन्हा लग्न करायला मला थोडी भीती वाटते. मला थोडा आता त्यावर विश्वास ठेवायला जड जातंय". 

पूनम ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. यामाध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या आयुष्यातील अपडेट ती सोशल मीडियावरुन शेअर करत असते.  वाद आणि पूनम पांडे हे जुनं समीकरण आहे. पूनमने फेब्रुवारी २०२४ मध्ये इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मृत्यूची खोटी बातमी पोस्ट केली होती. सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. या बातमीमुळे सेलिब्रिटींसह पूनमच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र, काही वेळाने तिने समोर येत आपण जिवंत असल्याचे सांगत कॅ्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी ही खोटी अफवा पसरवल्याचे सांगितले. तिला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. 

टॅग्स :पूनम पांडेसेलिब्रिटीसोशल मीडियालग्न