Join us
Daily Top 2Weekly Top 5

CID 2 मधून 'या' अभिनेत्याची एक्झिट, शेअर केली भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:00 IST

'CID २' या शोमधून एक कलाकारानं एक्झिट घेतली आहे.

CID हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलेल्या CID या शोचा पहिला भाग १९९८ साली सुरू झाला होता. तब्बल २० वर्षे सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर २०१८ मध्ये हा शो संपला. मात्र, CID वरील प्रेम कायम राहिलं आणि याच प्रेमामुळे काही महिन्यांपूर्वी 'CID २'च्या रूपाने हा शो नव्याने प्रेक्षकांसमोर आला. सीआयडीच्या पहिल्या सीझनला जितका प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, तितकाच तो दुसऱ्या सीझनलादेखील मिळताना दिसत आहेत. आता माहिती समोर येत आहे की या शोमधून एक कलाकारानं एक्झिट घेतली आहे. 

या नव्या सीझनमध्ये  शिवाजी साटम (ACP प्रद्युम्न) झळकले, पण काही एपिसोडनंतर त्यांच्या पात्राची एक्झिट दाखवण्यात आली. त्यानंतर शोमध्ये पार्थ समथान याची ACP आयुष्मान म्हणून एन्ट्री झाली होती. मात्र, आता 'CID २' मधून पार्थने एक्झिट घेतली आहे. अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहते आणि टीमला निरोप दिला आहे.

पार्थ समथानने सीआयडीच्या कलाकारांसोबत केक कापून शोचा निरोप घेतला. टीमसोबत केक कट करतानाचा व्हिडीओ अभिनेत्यानं शेअर केला आहे. ज्यात कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, "लोकांकडून ट्रोल होण्यापासून ते त्यांना या एसीपीवर प्रेम करायला लावण्यापर्यंत, हा प्रवास खूप सुंदर होता. शिकवणीनं भरलेला, हास्याने ओतप्रोत आणि गोड आठवणींनी सजलेला. CID टीमसोबत जे माझं नात तयार झालंय, ते मी आयुष्यभर जपेन. एकमेकांबद्दलचं प्रेम आणि सन्मान जबरदस्त होतं की,  आश्चर्य नाही की ही मालिका इतकी दीर्घकाळ चालली आणि एक आयकॉनिक शो ठरली.  मला तुमच्या कुटुंबाचा भाग बनवल्याबद्दल संपूर्ण क्रिएटिव्ह टीमचं आणि सोनी टिव्हीचं मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटू", असं त्यानं म्हटलं. 

पार्थ समथान हा टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. 'CID २ ' मधून मध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी तो 'कसौटी जिंदगी की २' या मालिकेत झळकला होता. त्यानंतर काही वेबसीरिजमध्येही तो दिसला होता. तब्बल ५ वर्षांच्या ब्रेकनंतर त्याने 'CID २' च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. शोमध्ये त्याची भूमिका जरी थोड्याच काळासाठी असली तरी प्रेक्षकांनी ती पसंत केली. चाहते त्याला आगामी वाटचालीसाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.

टॅग्स :सीआयडीटिव्ही कलाकार