Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्या वागण्याचं कोणाला वाईट वाटू नये म्हणून..."; पॅडी कांबळेने सूरजबद्दल सांगितली महत्वाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 09:13 IST

पॅडी कांबळेने बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यावर सूरज चव्हाणविषयी खास गोष्ट सांगितलीय (suraj chavan, bigg boss marathi 5)

पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे रविवारी बिग बॉसमधून बाहेर आला. पॅडी सर्वांचा लाडका अभिनेता. पॅडीने बिग बॉस मराठीमध्येही उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करुन सर्वांचं मन जिंकलं. बिग बॉस मराठीच्या घरात पॅडी आणि सूरजची खास मैत्री बघायला मिळाली. यावेळी बाहेर आल्यावर लोकमत फिल्मीशी बोलताना पॅडीने सूरजबद्दल महत्वाची गोष्ट सांगितलीय. पॅडी म्हणाला, "त्याने एकतर चांगला माणून व्हावं ही इच्छा आहे. जो काही अंशी तो आहे, काही अंशी तो कळत नाही."

पॅडी पुढे म्हणाला, "आता उदाहरणार्थ या हॉलमध्ये बसण्याची एक पद्धत असते ना. इथे काही खुर्च्या लावल्या, तिथे काही खुर्च्या लावल्या पण मध्येच एखादी खुर्ची लावली तर ते बरोबर दिसणार नाही. थोडेसे शिष्टाचार आहेत. गावाकडे या गोष्टी चालतात. पण यापुढे सूरज चार लोकांमध्ये उठणार बसणार आहे. तर ते काही शिष्टाचार आहेत. काही अलिखित गोष्टी आहेत. कुठे काय करावं, खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. कोणतरी आपल्याला सांगतंय तर आपण जांभई देताना तोंडावर हात वगैरे ठेवतो. अनावधानाने तुमच्या वागण्याचं कोणाला वाईट वाटू नये, त्या गोष्टी त्याला शिकवायच्या आहेत."

पॅडी शेवटी म्हणाला, "त्या त्या वेळची परिस्थिती ठरवेल मी त्याच्यासाठी काय करणार आणि त्याने माझ्यासाठी काय करायचंय. जसं मी माझ्या मुलींसाठी हट्टी असतो. त्यांना एखादी गोष्ट करायला सांगतो त्यामुळे तिचं चांगलं होणार आहे आणि त्याने मला आनंद होणार आहे. सूरजला काय व्हायचंय हे त्याने ठरवाचंय. त्यासाठी मी मदत करणार आहे. त्याच्या upbringing साठी मी कायम त्याच्यासोबत असणार आहे."

टॅग्स :बिग बॉस मराठीभात