Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेच्या कुटुंबाला पाहिलंय का? पत्नी अन् दोन मुलींसोबतची 'हॅपी फॅमिली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 14:04 IST

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे सहभागी आहे. पॅडीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या (paddy kamble, bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये 'पॅडी' कांबळे या नावाने मनोरंजन विश्वात लोकप्रिय असलेला अभिनेता पंढरीनाथ कांबळे सहभागी आहे. पॅडीला आपण विविध मालिका, नाटकं, सिनेमांमध्ये आजवर पाहिलंय. पॅडी बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पॅडीच्या कुटुंबाबद्दल अनेक जणांना ठाऊक नसेल. स्वतः पॅडी सुद्धा त्याच्या कुटुंबाबद्दल जाहीरपणे बोलताना दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पॅडी कांबळेच्या कुटुंबाबद्दल.

ही आहे पॅडी कांबळेची फॅमिली

कलर्स मराठीवर 'दर्शन' नावाची मालिका लागायची. अलका कुबल या मालिकेचं सूत्रसंचालन करायच्या. या मालिकेत महाराष्ट्रातील विविध मंदिर आणि देवस्थानांबद्दल माहिती मिळायची. याच मालिकेच्या एका भागात पॅडी कांबळे पत्नी आणि त्याच्या कुटुंबासोबत सहभागी झाला होता. पॅडीच्या पत्नीचं नाव आहे अनिता कांबळे. याशिवाय पॅडीला दोन मुली असून त्यांची नावं आहेत आद्या आणि ग्रीष्मा. पॅडीच्या मोठ्या मुलीलाही अभिनयाची आवड असून ती विविध स्पर्धांमध्ये भाग घेतेय. पाहा फॅमिली फोटो.

पॅडी या आठवड्यात नॉमिनेट

पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे या आठवड्यात नॉमिनेट झाला असून तो घराबाहेर जाणार की सेफ होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पॅडीसोबत या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी निखिल दामले, योगिता चव्हाण, घनःश्याम दरवडे, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी हे सदस्य नॉमिनेट आहेत. रविवारी रितेश देशमुख 'भाऊचा धक्का'वर घराबाहेर कोण जाईल हे जाहीर करेल. दरम्यान आजच्या भागात पॅडी घरातील सदस्यांची मिमिक्री करताना दिसणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीभातकलर्स मराठी