Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हाणायच्या हाताकडे चल!' पॅडीच्या मार्गदर्शनाखाली बहरला सूरजचा खेळ, किती रक्कम जिंकणार? प्रोमो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 11:28 IST

पॅडीने खास शब्दात सूरजला महाचक्रव्यूह भेदायला मदत केलेली दिसतेय (bigg boss marathi 5)

'बिग बॉस मराठी'च्या घरात काल सर्व टास्कचा बाप अर्थात महाचक्रव्यूह टास्क पार पडताना दिसला. या टास्कमध्ये काल निक्की-वर्षा, अंकिता-अभिजीत, धनंजय-जान्हवी खेळताना दिसले. या तिघांनी त्यांच्या पद्धतीने खेळ खेळून चांगली रक्कम कमावली. आज सर्वांचं लक्ष पॅडी-सूरजवर आहे.  याचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. जिंकण्यासाठी पॅडीच्या मार्गदर्शनाखाली सूरज महाचक्रव्युह कसं पार करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

पॅडीचा कोडवर्ड आणि सूरजची गती

आता समोर आलेल्या प्रोमोत तुम्ही पाहू शकता की, पॅडी भाऊ आणि सूरज हा महाटास्क खेळताना दिसत आहेत. या महाचक्रव्युहात सूरज डोळ्याला पट्टी बांधून पॅडी भाऊंनी सांगितलेल्या सूचना ऐकून तशी कृती करताना दिसत आहे. हाणायच्या हाताला चल..., असे सूरजला समजतील तसे कोडवर्ड वापरुन पॅडी-सूरजला मार्गदर्शन करताना दिसतो. पुढे जबरदस्त खेळ खेळत सूरज end ला येऊन २ लाखांची मोठी रक्कम कमावणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

कोणी किती रक्कम कमावली?

'बिग बॉस मराठी'च्या घरात आता या  महाचक्रव्युहात काल तीन जोड्यांनी परफॉर्म केलं. यामध्ये धनंजय आणि जान्हवी या दोघांनी १ लाख ३० हजार रुपये, निक्की आणि वर्षाताई यांनी २ लाख ८५ हजार रुपये तर अंकिता - अभिजीतने सर्वात ३ लाख १५ हजार ही जास्त रक्कम कमावली आहे. अशाप्रकारे या तिघांच्या रकमेची टोटल मारली तर साडेसात लाख रुपये रक्कम त्यांनी कमावली आहे. त्यामुळे सूरज-पॅडी किती रक्कम जिंकणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन