Join us

'मी कमेंट..' ऋतुजाच्या पोस्टवर ओंकार राऊतची पुन्हा कमेंट; अभिनेत्री म्हणाली, 'बडा आदमी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 14:13 IST

ऋतुजा बागवेने गुलाबी रंगाचा शॉर्ट वनपीस घातला आहे. यात ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे.

'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून लोकप्रियतेस आलेली मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) तिच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. ऋतुजा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. मालिका आणि नाटक अशा दोन्ही क्षेत्रात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकताच तिने गुलाबी रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये व्हिडिओ पोस्ट केला. यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार ओंकार राऊतने (Onkar Raut) पुन्हा कमेंट केली आहे. ऋतुजाचा फोटो म्हणल्यावर ओंकारची कमेंट असणारच.

ऋतुजा बागवेने गुलाबी रंगाचा शॉर्ट वनपीस घातला आहे. यात ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. मुंबईतील सुनसान रस्त्यावर तिने हे फोटोशूट केलेले दिसते. 'प्रिटी पिंक' असं कॅप्शन तिने दिलं आहे. तिच्या फोटोवर चाहते तर फिदा झालेच आहेत मात्र ओंकार राऊतच्या कमेंटने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. 'मी कमेंट न केलेलीच बरी' अशीच कमेंट केली आहे. यावर ऋतुजा म्हणते,

'तुझी कमेंट पण न्यूज होते यार.. तू तो बडा आदमी बन गया.'

ओंकारने ऋतुजाच्या पोस्टवर पहिल्यांदाच कमेंट केलेली नाही. तर याआधीही एकदा त्याने अशाच प्रकारे तिच्या एका बोल्ड फोटोवर कमेंट केली होती. त्यानंतर ओंकारचं ऋतुजासोबत फ्लर्ट असं म्हणत चर्चेला उधाण आलं होतं. 'तुझं माझं नेटवर्क गं' असं तो तिला म्हणाला होता. आता मात्र कमेंट नको असं म्हणत ओंकारने अप्रत्यक्षरित्या तिच्या फोटोंची स्तुतीच केली आहे.

टॅग्स :ऋतुजा बागवेमहाराष्ट्राची हास्य जत्रासोशल मीडिया