Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन् तो परत आला, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेची होणार धमाकेदार एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 15:59 IST

ओंकारने मध्यंतरी हास्यजत्रेतून एक्झिट घेतली होती. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. आता पुन्हा ओंकार भोजनेची हास्यजत्रेत एन्ट्री झाली आहे.

टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. प्रत्येक घराघरात पाहिल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे ओंकार भोजने. अभिनयाची उत्तम जाण, विनोदाचं अचूक टायमिंग आणि मेहनतीच्या जोरावर ओंकारने कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. ओंकारचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे ओंकार घराघरात पोहोचला. या शोमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. पण, ओंकारने मध्यंतरी हास्यजत्रेतून एक्झिट घेतली होती. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. आता पुन्हा ओंकार भोजनेची हास्यजत्रेत एन्ट्री झाली आहे. 

ओंकार भोजने प्रेक्षकांना हसवण्यासाठी पुन्हा हास्यजत्रेतून भेटीला येणार आहे. सोनी मराठीच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ओंकार त्याच्या स्टाइलने विनोदाचे पंच मारताना दिसत आगे. हास्यजत्रेत ओंकार पुन्हा दिसणार असल्याने चाहतेही खूश आहेत. या व्हिडिओवर ओंकारच्या चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. येत्या शनिवार-रविवारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकारची एन्ट्री होणार आहे. 

हास्यजत्रेतून ओंकारने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं होतं. अगं अगं आई असो अथवा मामा ओंकारच्या सगळ्याच व्यक्तिरेखा त्याच्या चाहत्यांना विशेष भावल्या होत्या. त्यामुळेच ओंकारने हास्यजत्रेतून एक्झिट घेतल्यानंतर त्याची उणीव चाहत्यांना जाणवत होती. आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकारने चित्रपटांतूनही अभिनयाची छाप पाडली. 'बॉइज २', 'सरला एक कोटी' या चित्रपटांत तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. हास्यजत्रेनंतर त्याने 'फु बाई फु'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ओंकार अभिनेता असण्याबरोबरच एक उत्तम कवीदेखील आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता