Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पारु' फेम अभिनेत्रीने सांगितलं भूमिका स्वीकारण्यामागचं कारण, म्हणाली 'पहिल्याच दिवशी मी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 16:30 IST

Mugdha karnik: या मालिकेत अहिल्या ही भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे पारु. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यांच्यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील पारु, आहिल्या, आदित्य या सगळ्यांनाच प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. यामध्येच आहिल्यादेवी किर्लोस्कर ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रेक्षकांचं लक्ष खासकरुन वेधून घेत आहे. ही करारी भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत असून तिने ही भूमिका नेमकी का स्वीकारली ते सांगितलं आहे.

"मी माझ्या आयुष्यात कधीच अशी भूमिका केली नाही. ज्यावेळी आपण आपल्या व्यक्तिमत्त्वापेक्षा काही तरी वेगळं करतो तेव्हा ते एक आव्हान असतं. मला ऑडिशन देतानाच मज्जा येत होती. कारण,तिथे सतत नवीन शिकायला मिळत होतं. अहिल्या नेहमी सत्याच्या बाजूने उभी असते. खोटं तिला सहन होत नाही. शून्यातून तिने आपलं साम्राज्य निर्माण केलं आहे, हालाखीचा काळ तिने पाहिला आहे ज्यामुळे ती अशी आहे. तिचं तिच्या दोनी मुलांवर खूप प्रेम आहे पण ते व्यक्तकरण्याची पद्धत वेगळी आहे. ती खूप कमी शब्दात बोलते पण ज्या प्रकारे बोलते ते बघण्यासारखं आहे", असं मुग्धा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझ्यासाठी एका आईची भूमिका निभावणं हेच मुळात नवीन आहे तेही इतक्या मोठ्या मुलांची. पण आमच्या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत सर कमाल आहेत. ज्या प्रकारे ते मार्गदर्शन करतात आणि आमच्याकडून गोष्टी  करून  घेतात हे खूप शिकण्यासारखं आहे. सुरुवातीला थोडा संकोच होता की इतक्या मोठ्या मुलांची आई कशी निभावणार पण जेव्हा अहिल्याला जाणून घेतलं तेव्हा मी तिच्या प्रेमात पडले. मी स्वतःला नेहमी सेटवर आठवण करून देते की मी दोन मोठ्या मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे.  कधी-कधी नकळत आपल्या हावभावांमध्ये दिसून येतं तर त्या गोष्टीची मी अतिशय काळजी घेते. जेव्हा पहिल्याच पहिला प्रोमो आला त्यारात्री मी उशिरापर्यंत जागी होती इतके फोन येतं होते मला, सोशल मीडियावर मेसेजसची उत्तरं देता देता घड्याळकडे लक्षच नाही गेले. पण खूप छान प्रतिसाद मिळतोय त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद.”

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार