Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नेहाने यशसमोर दिली प्रेमाची कबुली; दोघांच्या नात्यातील नवीन प्रवासाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:55 IST

Mazi tuzi reshimgath: यश आणि जेसिका यांच्यातील नातं नेहाला खटकत असल्यामुळे ती थेट यशसमोर जाऊन तिच्या प्रेमाची कबुली देते.

छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'.  सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांच्या प्रेमाचा सुंदर प्रवास दाखवण्यात येत आहे. नेहा तिचं प्रेम मान्य करत नसल्यामुळे यश आणि समीर मिळून एक प्लॅन करतात. त्यानुसार, या मालिकेत यशच्या गर्लफ्रेंडची म्हणजेच जेसिकाची एन्ट्री होते. विशेष म्हणजे जेसिका आणि यश यांची सातत्याने वाढत जाणारी जवळीकता पाहून आता नेहा तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये नेहा तिच्या प्रेमाची कबुली यशसमोर देणार आहे. विशेष म्हणजे यश आणि जेसिका यांच्यातील नातं नेहाला खटकत असल्यामुळे ती थेट यशसमोर जाऊन तिच्या प्रेमाची कबुली देते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये यश जेसिकाला लग्नाची मागणी घालतांना दिसत आहे. मात्र, या दोघांना एकत्र पाहिल्यावर नेहा धावत यशजवळ जाते आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगते. त्यामुळे आता या मालिकेत यश आणि नेहा यांच्या नात्याची नवी सुरुवात होताना दिसणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे