प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत असलेला 'फुलवंती' सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या सिनेमातील प्राजक्ताच्या भूमिकेचं प्रचंड कौतुकही झालं. प्राजक्ताच्या या सिनेमातील मदनमंजिरी हे गाणं प्रचंड व्हायरलही झालं होतं. या गाण्यावरील अनेक रील्सही इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्या होत्या. आता 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील लीलाने या गाण्यावर रील बनवला आहे.
'नवरी मिळे हिटलरला' मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरीने 'मदनमंजिरी' गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये तिच्यासोबत मालिकेत रेवती ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनेही ठुमके लगावले आहेत. लीला आणि रेवतीने मदनमंजिरी गाण्याच्या हुकस्टेप केल्या आहेत. त्यांचा हा रील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
११ ऑक्टोबरला प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. 'फुलवंती'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच प्राजक्ताने या सिनेमाची निर्मितीही केली आहे. तर स्नेहल तरडेंनी या सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल टाकलं. प्राजक्ता माळीसह गश्मीर महाजनी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तर स्नेहल तरडे, प्रसाद ओक, वैभव मांगले, हृषिकेश जोशी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील काही कलाकारही 'फुलवंती' सिनेमात झळकले आहेत.